चिंताजनक ; सोमवारी नव्याने ३३ कोरोना पॉझिटिव्ह ,तर १५ रुग्ण कोरोनामुक्त
चिंताजनक ; सोमवारी नव्याने ३३ कोरोना पॉझिटिव्ह ,तर १५ रुग्ण कोरोनामुक्त
कही खुशी, कही गम
हिंगोली - सोमवारी प्राप्त अहवालानुसार हिंगोली जिल्हयामध्ये नव्याने एकुन ३३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी १९ रुग्ण हे रेपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे व १४ रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट द्वारे आढळून आले आहेत,तर १५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
रॅपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे घेण्यात आलेल्या तपासणी द्वारे हिंगोली परिसर १३,कळमनुरी परिसर चार,आखाडा बाळापूर दोन,असे एकूण१९ रुग्ण अँटीजन तापसणीत आढळून आले आहेत. तर
आरटी पीसीआर द्वारे तपासणी द्वारे आढळून आलेल्यात
जिल्हा रुग्णालय एक,गाडीपुरा एक, भोईपुरा एक,जीप वसाहत एक,नरसी नामदेव एक,पिंपळ खुटा एक,कोथळज एक,सेनगाव शहर दोन,कळमनुरी शहर एक,वसमत फाटा एक, वसमत मामा चौक एक,गिरगाव एक अशा एकूण१४ रुग्णाचा समावेश आहे.
आज रोजी एकुन १५ रुग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन येथील १४ ,तर कोरोना केअर सेंटर वसमत येथील दोन ,यामध्ये देवागल्ली हिंगोली एक,तालाबकट्टा दोन,गाडीपुरा एक,कृष्ण मेडिकल एक,पेन्शन पुरा व आझम कॉलनी प्रत्येकी एक,सरस्वती कॉलनी एक,पंचसील नगर वसमत एक,छत्रपती शाहूनगर हिंगोली एक, जगदंबा हॉस्पिटल हिंगोली एक,सवड ता. हिंगोली एक,पूर्णा ता. परभणी एक,बाराशिव ता. वसमत एक,हिवरा ता.कळमनुरी एक, अशा१५ जणांचा समावेश आहे.आज पर्यंत हिंगोली जिल्हयात एकुण ८७३ रुग्ण झाले आहेत . त्यापैकी ६३७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांनासुट्टी देण्यात आली आहे .आज घडीला एकुन २२७ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि नऊ रुग्णाचा मृत्यु झाला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील
आयसोलेशन वॉर्ड येथे भरती असलेल्या पैकी आठ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन सुरु आहे. तर दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायप्याप वर ठेवण्यात आले आहे. आज एकूण दहा रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले आहे.