लॉकडाऊन उधळून लावण्याचा प्रयत्न वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
लॉकडाऊन उधळून लावण्याचा प्रयत्न
वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
हिंगोली - जिल्हाभरात गुरुवार पासून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेला लॉक डाऊन मान्य नसल्याचे सांगत वंचितच्या कार्यकर्त्यांनी संचारबंदीचा निषेध करत चप्पल दुकान लावून
लॉकडाऊन उधळून टाकण्याचा प्रयत्न करीत असलेल्या वंचित पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी (ता.६) ते १९ ऑगस्ट या दरम्यान जिल्हाभरात कडक टाळेबंदी लागू केली आहे. मात्र या संचारबंदीला वंचित आघाडीने विरोध करीत परवा गांधी चौकात निदर्शने करीत लॉक डाऊन उधळून टाकू असा पवित्रा घेतला होता. यावेळी त्यांच्यावर अप्पती कायदा प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.
गुरुवारी शहरासह जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदीची कडक अमलबजावनी सुरु असताना वंचितच्या दहा ते वीस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वंचित आघाडीचे जिल्हा संघटक रविंद्र वाढे यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक येथे संचारबंदीचा निषेध करीत घोषणाबाजी करीत चप्पल दुकान लावून फुटकळ व्यापाऱ्यांना ज्याचे हातावर पोट आहे अश्याना संधी दयावी म्हणत संचारबंदी उधळून टाकणाऱ्या कार्यकर्त्याना पोलिसानी ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात नेले.
रविंद्र वाढे यांनी सांगितले की जिल्हा प्रशासनाच्या संचार बंदीचा निषेध करून ही लागू केलेली संचार बंदी तातडीने हटविण्यात यावी गोर गरीब, फुटकळ व्यापाऱ्यांना हातावर पोट आहे, अशा लोकांना दुकाने उघडण्यात परवानगी दयावी अशी मागणी त्यांनी केली आहे.