दयानंद महाविद्यालयात 12 वी पास विधार्थ्याना बॅचलर ऑफ व्होकेशन पदवी  अभ्यासक्रमास प्रवेश सुरु

दयानंद वाणिज्य महाविद्यालयात बॅचलर ऑफ व्होकेशन पदवी  अभ्यासक्रमास प्रवेश सुरु

 

12 वी पास विधार्थ्याना उपयुक्त संधी 


 

लातूर  दि,28.

 

 लातूरचा शैक्षणिक पॅटर्न देशभर प्रसिद्ध असून त्यात दयानंद शिक्षण संस्थेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने अनेक सीए सी एस बँक अधिकारी, टॅक्स कन्सल्टंट ऑडिटर यासह नामवंत उद्योजक घडविले आहेत बदलत्या काळानुसार वाणिज्य व्यवस्थापन शिक्षणाकरिता अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे उद्योग व्यवसाय विविध कंपन्या राज्य व केंद्र सरकारर्च्या  विविध पदासाठी  आवश्यक असलेल्या कौशल्यावर आधारित कुशल मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने मनुष्यबळ विकास मंत्रालय व यूजीसी यांनी खास बॅचलर ऑफ वोकेशन अभ्यासक्रम सुरू  करून प्रवेश प्रक्रिया सुरवात केली असुन   याचाच एक भाग म्हणून दयानंद वाणिज्य महाविद्यालयात बी व्होक (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी)   या तीन वर्षीय पदवी  कौशल्याभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आला  आहे

 

 सदरील पदवी अभ्यासक्रम यूजीसी एन  एस क्यू एफ तसेच महाराष्ट्र शासन आणि स्वामी रामानंद तीर्थ   विद्यापीठ नांदेड मान्यताप्राप्त आहे तीन वर्षे अभ्यासक्रम हा बीकॉम अभ्यासक्रम आपेक्षा अधिक दर्जेदार व उपयुक्त असून वाणिज्य क्षेत्रात विविध करिअरच्या संधी उपलब्ध करून देणारा आहे सदरील पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बँक मॅनेजर अकाउंटिंग ऑफिसर इनव्हेटमेंट ॲनालिस्ट ऑडिट मॅनेजर इनव्हेटमेंट बँकर फायनान्स कन्सल्टंट अकाउंटंट अकाउंटिंग आणि ऑडिटिंग क्लार्क तसेच स्व व्यवसाय उभारणीस उपयुक्त ठरणार आहे.

 

दयानंद वानीज्य महाविध्यालयात ऑनलाईन अध्यापन अध्ययन व मूल्यमापन स्मार्ट बोर्ड क्लासरूम अनुभवी व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज संगणक प्रयोगशाळा सुसज्ज व समृद्ध ग्रंथालय इंटरनेट व वाय-फाय सुविधा बँकिंग स्पर्धा मार्गदर्शन वर्ग मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीग्रह आधी सुविधा  उपलब्ध करुन दिल्या आहेत शिवाय कॅम्पस मुलाखतीद्वारे आजवर शेकडो विद्यार्थ्यांची विविध कंपन्या व बँकिंग क्षेत्रांमध्ये विविध पदावर निवड झाली आहे.

 

दयानंद वाणिज्य महाविद्यालयांनी आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे सीएम या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी समन्वयक प्राध्यापक विशाल वर्मा मोबाईल  7709798889,9850028711,9028611640 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,सचिव रमेश बियानी,प्राचार्य डॉ श्रीराम सोळुके यानी केले आहे.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा