हिंगोलीत दहावीचा निकाल ९१.९३ टक्के
हिंगोलीत दहावीचा निकाल ९१.९३ टक्के
यंदाही मुलापेक्षा उत्तीर्ण होणाचे मुलींचे प्रमाण अधिक
हिंगोली - माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा औरंगाबाद शिक्षण विभाग मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल बुधवारी मंडळाने जाहीर केला असून हिंगोलीचा निकाल ९१.९३ टक्के लागला आहे. यंदाही मुला पेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलींचे अधिक असल्याने मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला मार्च-एप्रिल महिन्यात सुरुवात झाली. या परीक्षा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी पी. बी.पावसे ,संदीप कुमार सोनटक्के यांनी कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा घेण्यात आल्या. जिल्ह्यात दहावीसाठी सोळा हजार ४९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी १६ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी ५३ केंद्रावर परीक्षा दिली. यापैकी १४ हजार ९८८विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
दरम्यान, हिंगोली तालुक्यात ४१३२ विद्यार्थ्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी पैकी ४०८०विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून,३६९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याची ९०.८५ एवढी टक्केवारी आहे. तर कळमनुरी तालुक्यात ३३५८ विद्यार्थी परीक्षेला नोंदणी केली होती .त्यापैकी ३३२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३०४८विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ९१.६६ एवढी आहे.
वसमत तालुक्यात ४ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी चार हजार ३८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ४ हजार ०५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ज्याची टक्केवारी ९२.५८ एवढी आहे. सेनगाव तालुक्यात २ हजार ५५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन हजार ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर एक हजार ८६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ,ज्याची टक्केवारी ९३.५१ एवढी आहे. तसेच औंढा तालुक्यामध्ये दोन हजार ५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी दोन हजार ३१विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर एक हजार ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ९१.७७ एवढी आहे.
जिल्ह्यात सर्वधिक निकाल सेनगाव तालुक्याचा असून त्याची टक्केवारी ९३.५१ इतकी आहे. तर सर्वात कमी हिंगोली तालुक्याचा लागला असून त्याची टक्केवारी ९०.५८ एवढी आहे. जिल्ह्यात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९०.८७ टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.९० टक्के आहे. त्यामुळे मागील तीन वर्षापासून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी वाढली आहे. यंदाही ९० टक्के मिळविणाऱ्यात मुलींचा अग्रक्रम असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
मागील वर्षी पेक्षा यंदा जिल्ह्याच्या निकालात वाढ झाली असून टक्का वाढला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने घेतलेल्या प्रयत्नाला चांगले यश आले आहे. भरारी पथके, बैठे पथकांनी परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर वेळोवेळी भेटी दिल्या काही ठिकाणी गैर प्रकार वगळता इतर केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडल्याने निकालाचा टक्का वाढला असल्याचे मागील वर्षीच्या तुलनेत आकडेवारी वरून दिसून येते. जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी,निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सीईओ राधाबीनोद शर्मा, माध्यमिक शिक्षणाधिकारी पी. बी.पावसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के उपशिक्षणाधिकारी ए. आर. मलदोडे ,संतोष वडकुते, विनोद करंडे, एम. ए.सय्यद, पी. जी. पळसकर, आर. ए. कोंडावर यांनी अभिनंदन केले आहे.