हिंगोलीत तीन नव्याने पॉझिटिव्ह तर अकरा रुग्णाने केली मात


हिंगोलीत तीन नव्याने पॉझिटिव्ह तर अकरा रुग्णाने केली मात


कोरोनाने त्रिशतकाचा आकडा गाठला


हिंगोली - वसमत येथील क्वारंटाइन केलेल्या नव्याने तिघांना कोरोनाची बाधा झाली असून दोन पुरुष व एक महिला यांचा समावेश आहे. नांदेड येथे एका महिलेवर उपचार सुरु असून तिच्या संपर्कातील दोन्ही व्यक्ती आहेत. तर आज प्राप्त अहवालानुसार सहा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


दरम्यान, वसमत येथील क्वारंटाइन सेंटर येथून सहा रुग्ण बरे झाले आहेत. यात मन्नास पिंपरी एक, ताक तोडा एक, केंद्रा बु. एक, लिंग पिंपरी दोन तर पुन्हा वसमत येथील सहा असे एकूण अकरा रुग्ण बरे झाले आहेत. यात तीन रुग्णांना कोरोना ची बाधा झाली असून, अकरा रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व त्यांचे सहकारी एकूण ३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर परिवहन कार्यालयातील दहा अधिकारी, कर्मचारी यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यल्यातील दहा आवाहाला पैकी नऊ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक अहवाल राखीव आहे?त्याचा थ्रोट स्वाब परत तपासणी साठी पाठविला आहे.जिल्ह्यात आतापर्यन्त कोरोनाचे ३०० रुग्ण झाले आहेत त्यापैकी २६३रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आजघडीला ३७रुग्णावर उपचार सुरू आहेत.


जिल्हा आयसोलेशन वॉर्ड येथे सात रुग्णावर उपचार सुरु आहेत. यात रिसाला एक,मकोडी एक,बहिर्जी दोन, गांधी चौक दोन,एक जीएमसी नांदेड यांचा समावेश आहे.तसेच वसमत डेडीकेटेट येथे अकरा रुग्णावर उपचार सुरु आहेत. यात वसमत शहर एक,बहिर्जी नगर दोन, गणेशनगर एक,दर्गा पेठ एक,रिधोरा एक, टाकळ गव्हाण दोन,शुक्रवार पेठ दोन,जय नगर एक यांचा समावेश आहे.तर कळमनुरी येथे सात कोरोना सेंटर येथे रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये भाबळी एक, विकास नगर दोन, नवी चिखली तीन, डिग्रस एक, आदींचा समावेश आहे. लिंबाळा येथे सात रुग्णावर उपचार सुरु असून यात तलाब कट्टा एक, केंद्रा दोन, प्रगती नगर एक, भांडेगाव दोन, पिंपळखुटा एक, आदींवर उपचार सुरु आहेत. तसेच सेनगाव येथे केंद्रा येथील रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर औंढा येथे चार रुग्णावर उपचार सुरु आहेत यात दोन औंढा, भोसी दोन यांचा समावेश आहे.


जिल्ह्यात आयसोलेशनवॉर्ड व सर्व कोरोना सेंटर आणि गाव पातळीवर एकूण५३७७ रुग्णांना भरती केले आहे. त्यापैकी ४७०४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.४५३१ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला८३९ रुग्णांना भरती करण्यात आले असून ,४११ जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे डॉ. श्रीवास यानी  सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा