औंढा क्वारंटाइन सेंटर येथील एका ४२ वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा
हिंगोली - औंढा नागनाथ येथील क्वारं टाइन केलेल्या एका ४२ वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाला आहे. सदर महिला ही भोसी येथील रहिवासी असून कोरोना संक्रमित व्यक्ती सोबत मुंबईवरून परतली आहे.
विशेष म्हणजे भोसी गावातील गरोदर महिला जिला कोरोना लागण झाली होती. तिच्या कुटुंबातील व गावातील२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच घोळवा येथील एका७१ वर्षीय वृद्धाचा२८ जुलै रोजी हैद्राबाद येथे मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटूंबातील व गावातील जवळच्या संपर्कातील ३२ जणांचे थ्रोट नमुने तपासणी साठी पाठविले होते .त्यातील३१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. व एक अहवाल रिजेकट आहे. तो पुन्हा तपासणी साठी पाठविला जाणार आहे. कळमनुरी येथील कोरोना केअर सेन्टर येथे दोन रुग्णावर उपचार सुरू आहेत.यातील दोन्ही रुग्ण बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. गुरुवारी दोन रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून एक रुग्ण आढळला आहे.
आजघडीला जिल्ह्यात २७७ रुग्ण झाले आहेत.त्यापैकी २४० रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.तर एकूण३७ रुग्णावर उपचार सुरु आहेत. वसमत येथे तीन रुग्ण तर कळमनुरी केअर सेंटर येथे तेरा रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर कळमनुरी डेडी केटेट येथे दोन रुग्ण आहेत.तसेच लिंबाळा येथे दहा, सेनगाव पाच ,औंढा क्वारंटाइन सेंटर येथे चार रुग्ण भरती असून उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोना सेन्टर, गावपातळीवर, आयसोलेशन वॉर्ड येथे एकूण ४९२८ व्यक्तींना भरती केले असून ४३२३ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.४२४२ व्यक्तीना सुट्टी देण्यात आली आहे. सद्य स्थितीला ६७८ व्यक्ती भरती असून ३६७ जणांचे अहवाल बाकी आहेत.