दिलासादायक ; हिंगोलीत पाच रुग्णांची कोरोनावर मात

दिलासादायक ; हिंगोलीत पाच रुग्णांची कोरोनावर मात 


हिंगोली -  येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथील दोन जे गांधी चौक येथील व  कोरोना केअर सेंटर वसमत अंतर्गत ३ कोरोना  रुग्ण  यात २ बहिर्जी नगर , १ गणेश नगर बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . जिल्ह्यात रविवारी  पाच कोरोना रुग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना घरी सुट्टी देण्यात आल्याचे   जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.


रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार  आज पर्यंत हिंगोली जिल्हयात कोरोना चे एकुण ३३२ रुग्ण झाले आहेत . त्यापैकी २७७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन ५५ रुग्णांवर उपचार चालु आहेत .  आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे १६ कोरोना रुग्ण यात १ रिसाला बाजार , १ मकोडी , २ बहिर्जी नगर , १ गांधी चौक , १ जि.एम.सी.नांदेड , १ पेडगाव , २ शुक्रवार पेठ , १ नवलगव्हाण , ३ तलाबकट्टा , २ दौडगाव , १ गवळीपुरा येथील आहेत.


 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये १६ कोरोना रुग्ण  १ दर्गापेठ , १ रिधोरा , २ टाकळगाव , १ जय नगर , १ वापटी , ७ शुक्रवार पेठ , १ स्टेशन रोड , १ सोमवार पेठ , १ सम्राट नगर  येथील रहिवासी आहे तो उपचारासाठी भरती आहे . कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकुन ९ कोरोना रुग्ण  २ विकास नगर , ४ नवी चिखली , १ डिग्रस , १ शेवाळा , १ नांदापुर  येथील रहिवासी आहेत ते उपचारासाठी भरती आहेत . या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असुन कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत . 


कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत ११ कोरोना चे रुग्ण १ तलाब कट्टा , १ प्रगती नगर हिंगोली , ३ भांडेगाव , १ पिंपळखुटा , १ हनवतखेडा , ४ कळमकोंडा  उपचारासाठी भरती आहेत . त्यांची प्रकृती स्थिर असुन सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत . 


कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे ३ कोरोनाचे रुग्ण १ केंद्रा बुद्रुक, २ वैतागवाडी  उपचारासाठी भरती आहे . हिंगोली जिल्हयातंर्गत आयसोलेशन वार्ड , सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन ५७६५ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे . त्यापैकी ५१४२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत . ५०५ ९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे .


 सद्यस्थितीला ६९६ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी ३३३ अहवाल येणे व  थ्रोट स्वब घेणे प्रलंबित आहे . दरम्यान, हिंगोलीतील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , ज्यांना मधुमेह , उच्च रक्तदाब , श्वासाचे विकार , कॅसर इ . दुरधर आजार आहेत , यांनी आरोग्याची विषेश काळजी घ्यावी व काही त्रास झाल्यास तात्काळ जवळच्या उपकेंद्र ( सामुदाय आरोग्य अधिकारी मार्फत ) , प्राथमीक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालय , जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य तपासणी करुन घ्यावी तसेच अत्यंत महत्त्वाचे असल्याशिवाय घरा बाहेर पडू नये व अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबुन मोलाचे सहकार्य करावे . असे आवाहन डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी केले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा