भाजपचे एक आगस्ट पासून राज्यभर दूध एल्गार आंदोलन


भाजपचे एक आगस्ट पासून राज्यभर दूध एल्गार आंदोलन


जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन


हिंगोली - गायीच्या दुधाला सरसकट दहा रुपये लिटर अनुदान तर दूध 
पावडरला प्रति किलो ५० रुपये अनुदान आशा विविध मागणीसाठी आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे एक आगस्ट रोजी राज्यभर दूध एल्गार आंदोलन  छेडणार असल्याचे निवेदन सोमवारी( ता.२०) निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, दुधविकास मंत्री यांच्याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.


यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव ,आमदार तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर ,के. के. शिंदे, फुलाजी शिंदे, संतोष टेकाळे, राजू पाटील, ओम कोटकर आदींची उपस्थिती होती.


जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष ऍड. जाधव पत्रकारांना माहिती देताना म्हणाले ,एक आगस्ट पासून संपूर्ण राज्यभर दुध एल्गार आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारच्या हलगर्जी पणामुळे किंवा निष्काळजी पणामुळे कंपन्या शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन चे बियाणे देऊन फसवणूक केली असताना सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप करीत,शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बीज उगवले नाही.त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आधीच कोरोना संकट असताना पुन्हा त्यात प्रचंड नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला असल्याचे त्यांनी सांगितले.


पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने कुरुंदा, नरसी, औंढा मंडळात अतिवृष्टी झाली. यात सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी देखील केली आहे.तसेच युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याने काळा बाजार सुरु आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफीचा फायदा होत नाही. दुधाला भाव नाही, सरकारचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, राज्यात एक लाख, एक कोटी चाळीस लाख लिटर रोज दुधाचे संकलन होत आहे. यात३५ लाख लिटर दुध सहकारी संस्था घेत आहेत. यातील९० लाख लिटर दुध खाजगी डेअरी कडे जात आहे. पंधरा रुपये लिटर भाव असल्याने शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे शासनाने तीस रुपये प्रमाणे दूध खरेदी करावे असा आमचा आग्रह आहे. दुधाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर फेकून  दिले आहे. आशा विविध मागण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. आजपासून आमचे आंदोलन सुरू असल्याचे सांगून एक ऑगस्ट रोजी राज्यभर एल्गार आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा