विद्यार्थ्यांनो, ऑनलाईन शिक्षण घेताना विभिन्न प्रकारच्या सायबर धोक्यांपासून सावध रहा;
विद्यार्थ्यांनो, ऑनलाईन शिक्षण घेताना
विभिन्न प्रकारच्या सायबर धोक्यांपासून सावध रहा;
परभणी जिल्हा पोलीस दलाचे आवाहन
परभणी / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेताना विभिन्न प्रकारच्या सायबर धोक्यांपासून सावध रहावे, असे आवाहन परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
आजकाल मुले इंटरनेटचा वापर ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी, सोशल नेटवर्कीग साईटचा वापर करण्यासाठी गेम्स खेळण्यासाठी, नवनविन ऑनलाईन मित्र बनवण्यासाठी, शॉपिंग करण्यासाठी करत असतात. त्यासाठी पालकांनी सध्याच्या परिस्थीतीत लक्ष देणे गरजेचे आहे. मुले उत्तम रितीने मोबाईलचा वापर करतात पण याचा अर्थ असा नाही की, ते सायबर साक्षर आहेत. त्यामुळे मुलांच्या रात्री उशिरा मोबाईल किंवा लॅपटॉप वापरण्यावर मर्यादा ठेवा. मुले इंटरनेटवर कोणाच्या संपर्कात आहेत याचा मागोवा ठेवा, आपल्या मुलांची इंटरनेट अॅक्टीव्हिटी तपासा, मुलांशी त्याच्या दैनंदिन अॅक्टीव्हिटींबाबत संभाषण करा.
सोशल नेटवर्कीग साईट, ईमेल, चॅटरूम, नकली सॉफटवेअर, नकली प्रोफाईल, बनावटी हुबेहुब वेबसाईट ईत्यादी प्लॅटफार्मचा उपयोग पिडीत व्यक्ती हमला करण्यासाठी करत असतात. त्यामुळे मुले पण विभिन्न प्रकारच्या सायबर अपराधाचे शिकार होऊ शकतात. यासाठी मुलांना वेळीच सावध करा. मुलांना सायबर शिक्षेबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन माहिती द्या. मुले अथवा वापरकर्ते जे काही ऑनलाईन पोस्ट करतात ती माहिती नेहमीकरिता तेथेच राहत असते. ती पुर्णपणे डिलीट करणे कठीण असते त्यामुळे मुलांना याबाबत ज्ञात करा.
मुलांना सोशल मिडीया प्लॅटफार्मवर कमेंन्टमध्ये किंवा पोस्टमध्ये आपला मोबाईल नंबर किंवा ईतर खाजगी माहिती जसे जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, फोटो, आधारकार्ड, आई-वडिलांचे क्रेडीट कार्ड अथवा डेबीट कार्डची माहिती शेअर न करण्याबाबत जागरूक करा. सोशल मिडीया प्लॅटफार्मवर प्रायव्हसी सेटींग करुन घ्यायला सांगा. नेहमीच एक सशक्त पासवर्ड वापरा जेणेकरून कोणाच्याही लक्षात येणार नाही. पासवर्ड नेहमी बदलत रहा. आपला पासवर्ड कोणालाही सांगू नका. आपली प्रोफाईल फक्त आपल्या ओळखीच्या मित्रांपर्यंत सिमीत ठेवा. अनोळखी माध्यमाव्दारे अनावश्यक स्वॉफटवेअर, अॅप्स, डेटींग ऍप्स, ऑनलाईन गेम्स ईत्यादी इन्स्टॉल करू नका. विश्वसनीय संकेतस्थळावरूनच अॅप डाऊनलोड करा. अश्लील सामग्री, घाणेरडे कमेंन्ट, परेशान करणारे पिक्चर, व्हिडोयो हे पोस्ट करतांना काळजी घ्या. ते तुमच्या मित्रांना त्रास देणारे नसावीत कारण असे करणे कायद्याने दंडनीय अपराध आहे. ऑनलाईन भेटलेल्या व्यक्तीला प्रत्यक्षात भेटू नका, संपर्कही साधू नका. चांगला इंटरनेट उपयोगकर्ता बना, असे आवाहन पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांंच्या वतीने पालकांना व मुलांना सायबर सुरक्षेबाबत करण्यात आले आहे.
जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी.