लातूर शहर व जिल्ह्यात यापूर्वीप्रमाणेच सर्व आस्थापना व दुकाने सुरू राहतील*

वृत्त क्रमांक:-         दि. 2 जुलै 2020



*नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये* 


*लातूर शहर व जिल्ह्यात यापूर्वीप्रमाणेच सर्व आस्थापना व दुकाने सुरू राहतील*
         *-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत*



लातूर, दि.2(जिमाका):- उद्यापासून लातूर शहरासह जिल्ह्यात लॉक डाउन जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
     यापूर्वी प्रशासनाने दिलेल्या आदेशान्वये दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने (अत्यावश्यक सेवेतील रुग्णालय औषधी दुकाने नियमितपणे सुरू राहतील) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नियमितपणे सुरू राहणार आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्या दिनांक 3 जुलैपासून इतर कोणत्याही प्रकारचा लॉक डाऊन जाहीर केलेला नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व रस्त्यावर गर्दी करू नये व पूर्वीच्याच लॉकडाऊन प्रमाणे नियमितपणे सर्व आस्थापना सुरू राहणार आहेत याची दखल दखल घ्यावी व  माज माध्यमे व इतर कोणाकडूनही पसरविण्यात येणार्‍या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवहन  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
                  ************


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा