विभागीय आयुक्तांची अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
विभागीय आयुक्तांची अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
कोरोनाबाबत उत्कृष्ट केलेल्या नियोजनाने आयुक्त भारावले
हिंगोली - कोरोना रुग्ण बरे होण्यात हिंगोली जिल्हाने राज्यात अव्वल कामगिरी करून विभागात मानाचा तुरा रोवल्याने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी (ता.१३)हिंगोली दौऱयांवर आले असता कोरोना बाबत आढावा बैठक घेऊन कोविड रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील बहरलेली वृक्ष पाहून अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.विशेष करून कोरोना बाधित रुग्णावर उपचार करणाऱ्या परीचारिकेवर स्तुती सुमने उधळत अभिनंदन केले.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या नियोजन बद्ध मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कुमार प्रसाद श्रीवास ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार ,महसूल विभाग, पालिका प्रशासन ,पोलीस विभाग आदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली .त्यामुळे रुग्ण बरे होण्यात राज्यात रिकव्हरी रेट कमी असल्याचे सांगून आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्यात हिंगोलीने रुग्णालयात अपुरा स्टाफ असून देखील शिस्त बद्ध नियोजन करीत परिस्थिती हाताळली आणि कोरोना मृत्यूचे प्रमाण ही अगदी नगण्य असल्याने कसे काय नियोजन केले याबाबत खास आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे सोमवारी (ता.१३) अचानक कोरोना रुग्णांची पाहणी करण्यासाठी धावती भेट दिली असता अधिकारी ही गोंधळात पडल्याचे चित्र होते. प्रारंभी आयुक्त केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना बाबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे , निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी ,सीईओ राधाबिनोद शर्मा, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची उपस्थिती होती.
यावेळी केंद्रेकर म्हणाले, कन्टेन्टमेन्ट झोनमधील नागरिकांची आरोग्य यंत्रणेच्या मार्फत तपासणी करून १४ दिवसात हा व्यक्ती कोणाच्या संपर्कात आला का त्याचे मोबाईल ट्रेस करून माहिती घ्यावी, तसेच पोलीस विभाग व अधिकारी यांच्यात समन्वय ठेवून कामे करावीत, विशेष म्हणजे डब्लिन्ग चे प्रमाण कमी असल्याचे सांगून अधिकाऱ्यावर स्तुती सुमने उधळली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील लावलेल्या वृक्षाची पाहणी करून कौतुक केले. त्यानंतर केंद्रेकर यांनी थेट सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डातील कोरोना बाधित रुग्णांची पाहणी केली. यात तिघे जण खूप गंभीर असल्याचे आढळून आले.यात दोघे ऑक्सिजन वर आहेत त्या दोघांची भेट घेतली. परंतु रुग्णालयाने चांगली व्यवस्था केली असल्याचे सांगून रुग्णासाठी सर्व डॉक्टर, नर्सेस कमी कर्मचारी असतानाही जीव ओतून काम करीत आहेत.त्यामुळे रुग्ण संख्या आटोक्यात येत आहे. तसेच नवीन औषधी आली आहे.रेमडीसीरील ,टूसीलीस ही इंजेक्शन तातडीने मागवून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जयवंशी यांना दिल्या आहेत.शेवटी औंढा रस्त्यावर उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाची पाहणी करून आतील व्यवस्था पाहून आयुक्त भारावले होते.