चिंताजनक ; हिंगोलीत एकाच दिवशी तब्बल २२ रुग्ण पॉझिटिव्ह
चिंताजनक ; हिंगोलीत एकाच दिवशी तब्बल २२ रुग्ण पॉझिटिव्ह
सारी रुग्णाचा मृत्यू नंतर अहवाल पॉझिटिव्ह ,तर दहा रुग्णांची प्रकृती गंभीर
हिंगोली - जिल्ह्यात सोमवारी रात्री साडे दहा वाजता प्राप्त अहवालानुसार एकाच दिवशी नव्याने २२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली असून,काल सारीच्या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दहा रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा प्रशासनाची आणखी चिंता वाढली आहे.
यामध्ये तालाब कट्टा कन्टेन्टमेन्ट झोन मधील कोविड अँटीजन टेस्ट तपासणी मध्ये पाच कोरोना रुग्णाचा समावेश आहे. कळमनुरी भाजी मंडई येथील८०,४२,२०,१७ स्त्री तर ४५, २२ पुरुषाचा समावेश असून कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. वसमत अशोक नगर येथील वीस वर्षीय पुरुष व सहा वर्षाचा मुलाचा समावेश आहे, तर शुक्रवार पेट येथील३६ वर्षीय स्त्री, हिंगोली आझम कॉलनी २८ वर्षीय पुरुष, तसेच हिंगोली येथील विठ्ठल नगर, श्रीनगर येथील एका ६० वर्षीय पुरुष, कासारवाडा येथील२५ वर्षीय पुरुष याशिवाय आरोग्य विभागातील४०,३२,४०,४२,३२ अश्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तालाब कट्टा येथील५८स्त्री,४५,५८,स्त्री, तर ५०,१८ पुरुषाचा समावेश असून जवळच्या रुग्णांशी संपर्क आला आहे. तालाब कट्टा येथील चार ही जण कन्टेन्टमेन्ट झोन कोविड अँटीजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह निघाले आहेत. कळमनुरी तालुक्यातील
कळमकोंडा येथील येथील एकाचा आयसोलेशन वॉर्डात उपचारा दरम्यान सारीच्या आजाराने १८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. परंतू त्याचा मृत्यू नंतर पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.
दरम्यान,वसमत अंतर्गत कोरोना केअर सेंटर येथे नऊ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये शुक्रवार पेठ सात,वापटी एक, सोमवार पेठ एक,असे नऊ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यन्त ४३३ रुग्ण झाले असून, त्यापैकी ३१९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे.आजघडीला एकूण ११३ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यातील एका जणाचा मृत्यू झाला आहे.तर औंढा येथे अंजनवाडी येथील एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय
आयसोलेशन वॉर्ड अंतर्गत ३२ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. यामध्ये. रिसाला एक, जीएमसी एक, धूत हॉस्पिटल एक, ब्राह्मण गल्ली वसमत एक,पेडगाव एक, शुक्रवार पेठ नऊ, नव्हलगव्हाण एक, तालाब कट्टा दोन, गवळीपुरा एक, पेन्शनपुरा एक,
अंजनवाडी एक, सेनगाव तीन,
जयपूरवाडी एक ,नवा मोंढा हिंगोली एक, कासारवाडा दोन, आझम कॉलनी दोन ,पलटण एक, नारायणनगर एक, अशोक नगर एक,श्री नगर एक यांचा समावेश आहे.
तर वसमत येथील डेडीकेटेट कोअर सेंटर येथे १५ रुग्ण भरती असून यात स्टेशन रोड तीन, सोमवार पेठ एक, सम्राटनगर पाच, गणेशपेठ एक, पारडी एक, गुलशन नगर एक, बहिर्जी नगर एक ,स्वानंद कॉलनी एक, अशोक नगर दोन यांचा समावेश आहे.
तसेच कळमनुरी येथे कोरोना सेंटर मध्ये एकूण १६ रुग्णावर उपचार सुरु असून, नवी चिखली तीन,नांदापूर एक,आखाडा बाळापूर तीन नांदेड संदर्भीत, कांडली दोन, रेडगाव एक, भाजी मंडई सहा यांचा समावेश आहे. याशिवाय लिंबाळा अंतर्गत कोरोना सेंटर येथे ३४ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये पेडगाव चौदा ,
रामादेऊळगाव पाच,पहेनी दोन,
माळधामणी एक,तालाब कट्टा पाच ,खडकपुरा सात यांचा समावेश आहे.सेनगाव येथे बस स्टँड येथील एक, बालाजीनगर तीन, समता नगर पाच, जणांचा समावेश असून रुग्णावर उपचार सुरु आहेत.या सर्वांची प्रकृती ठीक असून कोणतेही गंभीर लक्षणे दिसून येत नसल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
जिल्ह्यात गावपातळीवर तसेच क्वारं टाइन सेंटर अंतर्गत ६४३८ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ५७९६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.५५१६ व्यक्तींना घरी सुट्टी देण्यात आली आहे.आजघडीला ८८१ रुग्ण भरती असून, २६६ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णा पैकी दहा रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.