कोरोना मीटर सुरूच; शनिवारी पुन्हा नव्याने २३ जणांना कोरोनाची लागण
कोरोना मीटर सुरूच; शनिवारी पुन्हा नव्याने २३ जणांना कोरोनाची लागण
अँटीजन टेस्ट मध्ये १५ रुग्ण सापडले
हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शनिवारी( ता.२५) प्राप्त अहवालानुसार २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यामध्ये १५ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये सापडले असल्याने जिल्ह्यात कोरोना मीटरचा आकडा वाढत असून लिंबाळा क्वारंटाइन येथील मृत्यू झालेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोना मीटर काही उपाय योजना केल्या तरी थांबण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा ५५६ च्या घरात गेला आहे. आज प्राप्त अहवालानुसार
कोरोना रुग्ण आढळून आलेल्या पैकी १५ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये सापडले आहेत. यातील हिंगोली शहरातील वंजारवाडा येथील१५ रुग्ण आहेत. यामध्ये ३५,३६,७५,५२,४४वर्ष महिला३२,२६,३०,३७,१९,३२,१८,वर्ष पुरुष असून यात८,५,वर्षाचा मुलगा असून सात महिन्याचा बाळाचा समावेश आहे. आझम कॉलनी येथील तिघे असून यामध्ये ६०,३० वर्ष पुरुष तर ५०वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. पुन्हा एका आझम कॉलनी येथील ८० वर्षीय महिला कोरोना व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोना सेंटर येथे भरती करण्यात आले होते. मात्र त्या महिलेचा मृत्यू झाला असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच एसआरपीएफ येथील एका ३४ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. तर शहरातील खडकपुरा येथील एका ५० वर्षीय महिलेस बाधा झाली आहे. तालुक्यातील कलगाव येथील दोघांना लागण झाली असून यात ४०,१७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आज रोजी चार रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये वसमत येथील रेल्वे रोड, बहिर्जी नगर,एक पारडी बुद्रुक या तिघांचा समावेश आहे.तर एक रुग्ण सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती होता. तो बरा झाला असल्याने सुट्टी देण्यात आली तो जयपूरवाडी येथे राहत आहे. जिल्ह्यात नव्याने २३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर चार रुग्ण बरे झाले आहेत. तर एका महिलेचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह निघाला आहे.
आतापर्यन्त जिल्ह्यात कोरोनाचे ५५६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३५८ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने घरी परतले आहेत. आजघडीला एकूण १९२ रुग्णावर उपचार सुरु आहेत. सहा कोविड रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्हानंतर्गत आयसोलेशन वॉर्ड सर्व कोरोना सेंटर व गाव पातळीवर तयार कारण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर अंतर्गत एकूण ७०६२ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ६३०६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.६३३४ जणांना सुट्टी देण्यात आली. सद्यस्थितीला ७०१ रुग्ण भरती असून, आजरोजी २४० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आयसो लेशन येथे भरती असलेल्या पैकी १४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजन सुरु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.