परभणीत दोन लाखाचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त
परभणीत दोन लाखाचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त
परभणी, दि.1(प्रतिनिधी)-
शहरातील मध्यवस्तीतील आर.आर.टॉवरलगत छोटया बोळीतील एका दुकानातून जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी(दि.एक) सायंकाळी दोन लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला.
या दुकानातून तंबाखूजन्य वेगवेगळे पदार्थ सर्रासपणे विक्री होत होते. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुध्दा त्या विक्रेत्याने विक्रीचा सपाटा सुरू ठेवला होता. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकास ती बाब निदर्शनास आली. तेव्हा पोलिस उपनिरीक्षक विश्वास खोले यांच्या नेतृत्वाखाली भारत नलावडे, अजहर पटेल, दया पेटकर, जगन्नाथ भोसले, सुधीर काळे, पुंजाजी साळवे यांनी ही कारवाई करीत दोन लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला. सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरू होता. या संदर्भात तपशीलवार माहिती आली नाही.