हिंगोली : सीओ पाटील यांची बदली रद्द करा जिल्हाधिकाऱ्याकडे विविध संघटनेचे निवेदन
सीओ पाटील यांची बदली रद्द करा
जिल्हाधिकाऱ्याकडे विविध संघटनेचे निवेदन
हिंगोली - येथील पालिकेचे सीओ रामदास पाटील यांची सोमवारी मुंबई येथे सहाय्यक आयुक्त पदी बदली झाल्याचे आदेश धडकले.त्यांच्या जागी कारंजा येथील कुरवाडे यांची नियुक्ती केली आहे. बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्हा व्यापारी महासंघ, भाजपा, मनसे ,आदी संघटनेच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनसादर करण्यात आले.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे
भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे,जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेशचंद्र बगडीया, आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, गेली चार वर्षापासून रामदास पाटील येथे कार्यरत आहेत. स्वछ सर्व्हेक्षण मध्ये पालिकेला विविध पुरस्कार मिळवून दिले.शहरातील अतिक्रमण काढून रस्त्याची कामे सुरू करून शहराच्या विकास कामांना चालना दिली आहे. याशिवाय कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक उपाययोजना राबवित असून कोरोना संसर्ग परिस्थिती कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची मुंबई येथे झालेली बदली रद्द करण्याची मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.
निवेदनावर रमेशचंद्र बगडीया ,श्याम सुंदर मुंदडा, सुनील माणका,अशोक बासटवार ,पंकज अग्रवाल,ओमप्रकाश खंडेलवाल , तर दुसऱ्या निवेदनावर भाजप आमदार तानाजी मुटकुळे, बाबाराव बांगर ,के. के. शिंदे, प्रशांत सोनी,नारायण खेडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.