तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


हिंगोली - मानसिक तणावातून एका तरुणाने राजू कदम यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुनील काशिनाथ बांगर (२४)असे मयताचे नाव आहे.


शहरालगत असलेल्या पाच किलोमीटर अंतरावर गंगाराम बांगर यांचे शेत आहे. त्यांच्या बाजूलाच राजू बांगर यांचे शेत आहे. शुक्रवारी सुनील बांगर वय(२४)राहणार वंजारवाडा  हा शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घराबाहेर पडला त्यानंतर तो घरी परतला नव्हता. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता कुठेही सापडला नाही.शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह राजू कदम यांच्या शेतातील झाडाला दिसून आला. त्यानंतर या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे बिट जमादार आर.एस.हरकाळ यांनी पंचनामा करून मृतदेहावर सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांकडे मृतदेह ताब्यात दिला. गंगाराम बांगर यांच्या फिर्यादी वरून शनिवारी (ता.४)ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. चव्हाण करीत आहेत.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा