लाख येथे धाडसी चोरी ,तीन लाख ९७ हजाराचे दागिने पळविले

लाख येथे धाडसी चोरी ,तीन लाख ९७ हजाराचे दागिने पळविले


हिंगोली - औंढा तालुक्यातील लाख येथे ता. एक ते दोन जुलै च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोंडा तोडून तीन लाख ९७ हजाराचा ऐवज लाम्बविला असल्याची घटना गुरुवारी उघडकीस आल्याने लाख येथे एकच खळबळ उडाली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, संजय लोंढे यांच्या लाख येथील राहत्या घरी एक ते दोन जुलै च्या मध्यरात्री ते दुसऱ्या मजल्यावर झोपले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला असता कपाटात ठेवलेले दहा हजार पाचशे रुपयांची सोन्याची दुहेरी मण्याची पोथ, तीन एकदानी सोन्याची प्रत्येकी दहा हजार पाचशे,एक कानातील सोन्याचे झुमके ज्याची किंमत २८००,तीन जोड कानातील सोन्याच्या पत्या ८८००, अकरा ग्राम कानातील तीन सोन्याच्या जोड पत्या ३८५०० ,एक तोला वजनाचा नेकलेस ३५००, साडे तीन तोळ्यांच्या पाटल्या एक लाख पाच हजार पाचशे,दीड तोळ्यांचे सेवन पीस ५२५०, साडे तीन तोल्याच्या गव्हाळ मान्याच्या तीन पोथ एक लाख पाच हजार पाचशे,तीन तोळ्याचे एक गांठण१०,५००,एक एकरा ग्राम सोन्याचे लॉकेट ३८५०,वीस तोळ्याचे पायातील चांदीचे चैन १६००, एक बाजू बंद व कमरेची चैननऊ तोळे वजनाची जुने ७२०,९०हजार रोकड, असा एकूण मिळून तीन लाख ९७ हजार ५२० रुपयांचे अज्ञात चोरट्याने दागिने पळविले असल्याची तक्रार संजय लोंढे यांनी बासंबा पोलीस ठाण्यात दिली असून त्यावरून
 डीवायएसपी रामेश्वर वैन्जने, पोलीस निरीक्षक मलपिल्लू यांनी लाख येथे भेट देऊन चोरी झालेल्या घराची पाहणी करून पंचनामा केला आहे.पुढील तपास भोसले करीत आहेत. या धाडसी चोरी मुळे लाख परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरट्यास पकडण्याचे मोठे आव्हान पोलीसा समोर उभे आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा