परभणी, पूर्णा, पालम, गंगाखेड, पाथरी, मानवत व सेलूत संचारबंदी
परभणी, पूर्णा, पालम, गंगाखेड, पाथरी, मानवत व सेलूत संचारबंदी
परभणी, दि.5(प्रतिनिधी)
परभणी महानगपालिका हद्द आणि लगतचा 5 किमीचा परिसर तसेच पूर्णा, पालम, गंगाखेड,पाथरी, मानवत व सेलू नगरपालिका व नगरपंचायत हद्दीमध्ये व त्यालगतच्या 3 किमी परिसरात दि.5 जुलै रात्री 12 वाजल्यापासून ते दि.8 जुलै रोजी रात्री 12 वाजपर्यंत संचारबंदी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी लागू केली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने दि.2 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते दि.5 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यात वाढ करण्यात आली आहे. दि.5 रोजी रात्री 12 वाजल्यापासून दि.8 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
संचारबंदी काळात सर्व शासकीय कार्यालय त्याचे कर्मचारी, त्यांचे वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खासगी दवखाने, सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय आपतकाल व त्यासंबंधी सेवा, शासकीय निवारागृहात तसेच शहरात अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांचे वाहने, अत्यावश्यक सेवेसेठी परवाने घेतलेले वाहनेै व व्यक्ती. प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक अदाी, पेट्रोलपंप व गॅस वितरक, कर्मचारी व त्यांचे वाहने, खत, कृषी, बि-बियाणे विक्री व वाहतुक त्यांचे गोदामे,दुकाने, त्यांच्यासाठी लागणारी वाहने व कामगार व कापूस खरेदी केंद्र, राष्ट्रीयकृत बँका केवळ रास्तभाव दुकानदार यांचेकडून चालनाद्वारे पैसे भरणा करून घेणे व बँकेची ग्रामीण भागात रोकड घेवून जाणारी वाहने यांना मुभा आहे. तसेच दुध विक्रेत्यांना सकाळी सहा ते नऊ या वेळेत सुट देण्यात आली असल्याचे आदेशात नमुद केले आहे.