चिंताजनक; हिंगोली, मंगळवारी एकाच दिवशी तब्बल २८ रुग्ण पॉझिटिव्ह
चिंताजनक; मंगळवारी एकाच दिवशी तब्बल २८ रुग्ण पॉझिटिव्ह
हिंगोली तालुक्यातील सर्वाधिक १९ रुग्णाचा समावेश
हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यामध्ये सर्वाधिक १९ रुग्ण हिंगोली तालुक्यातील आहेत.त्यापाठोपाठ वसमत तीन, सेनगाव, औंढा प्रत्येकी एकतर कळमनुरी तालुक्यात एकही रुग्ण नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी सांगितले.एसआरपीएफ जवानानंतर हा आकडा पुन्हा वाढला असल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
शहरातील पेन्शनपुरा ,गोदावरी हॉटेल जवळ एक ४१ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली असून ,त्याचा बाहेर गावावरून आल्याचा पूर्व इतिहास नाही. परंतु तो सारीच्या आजाराने रुग्णालयात भरती आहे. दुसरा रुग्ण जो३२ वर्षीय पुरुष असून तो औंढा तालुक्यातील अंजनवाडी येथील रहिवासी आहे.या व्यक्तीचा ही पूर्व इतिहास नसल्याने हा व्यक्ती देखील सारीच्या आजाराने रुग्णालयात भरती आहे. त्यानंतर सेनगाव बसस्थानक जवळील एका३५ वर्षीय पुरुषाला सर्दी, खोकला, ताप येत असल्याने रुग्णालयात भरती आहे. या व्यक्तीचा पण पूर्व इतिहास नाही.
मंगळवारी प्राप्त अहवालानुसार मंगळवारी सर्वाधिक रुग्ण हिंगोली तालुक्यातील असून पेडगाव येथील अकरा रुग्णाचा यात समावेश आहे. यामध्ये ३५,३०,५५,२२,पुरुष तर ४५,२५,३०,२२,५५,महिला तसेच अकरा वर्षाचा मुलगा व सहा वर्षाच्या मुलीचा कोरोना पॉझिटिव्ह मध्ये समावेश आहे.हे सर्व जण कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.याशिवाय वसमत येथील दोघे जण असून यात एक जणस्टेशन रोड येथील १३ वर्षीय मुलगी असून ही कोरोना व्यक्तीच्या संपर्कातील आहे. तर दुसरा २६ वर्षीय तरुण असून गणेश पेठ येथील रहिवासी आहे. तो पुणे येथून गावी परतला आहे.
हिंगोली तालुक्यातील रामादेऊळगाव येथील३०,२५,वर्षीय महिला व१३ वर्षीय मुलगी ,११ वर्षाचा मुलगा हे चौघे जण मुंबई वरून गावी परतले आहेत. तर दुसरा याचा गावातील२४ वर्षाची महिला असून ती पुणे येथून गावी परतली आहे. तसेच पहेनी येथे२२,४८ वर्षाच्या या दोन महिला औरंगाबाद येथून गावी परतल्या आहेत. तर माळधामणी येथील एका२९ वर्षीय तरुणाला लागण झाली असून तो मुंबई वरून परतला आहे. तसेच जयपूरवाडी येथे ४५ वर्षीय महिला सुरत येथून गावी परतली आहे.
येथील आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आलेल्या१९ रुग्णापैकी चार रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना ऑक्सिजन वर ठेवण्यात आले आहे. तसेच यातील दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपाप मशीनवर ठेवले आहे. एकूण सहा रुग्णाची तब्येत चिंताजनक असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. आतापर्यन्त जिल्ह्यात ३६१ रुग्ण झाले असून, त्यापैकी२८७ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आजमितीला एकूण ७४ रुग्णावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.