आई वडिलांच्या भेटीसाठी जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू
आई वडिलांच्या भेटीसाठी जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू
हिंगोली - अमरावती ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत कोरूना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त करून आई - वडिलांना भेटण्यासाठी लातुर जिल्ह्यातील मूरदड येथे जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा हिंगोलीत बुधवार( ता. २२) सकाळी अपघाती मृत्यू झाला आहे .
शहरातील वळण रस्त्यावर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला . या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली . यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले . पोलिसांनी दुचाकीस्वाराच्या खिशातील ओळखपत्राची पाहणी केली असता सदर दुचाकीस्वाराचे नांव हनुमंत विष्णू मुर्टे ( वय 27 रा . मुरदड जि . लातूर ) असे होते.
पोलिसांनी मुरटे याच्या कुटूंबियांशी संपर्क साधून माहिती दिली आहे . याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती . दरम्यान हनुमंत मुर्टे हे नोव्हेंबर 2018 रोजी अमरावती ग्रामीण पोलिस दलात भरती झाले होते . मागील चार महिन्यापासून ते कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या बंदोबस्तात होते . चार महिन्यापासून आई वडिलांची भेट झाली नसल्याने ते मंगळवारी ता . 21 रात्री 15 दिवसाची अर्जित रजा देऊन दुचाकी वाहनावर गावाकडे निघाले होते . मात्र गावी पोहोचण्यापूर्वीच हिंगोली येथे त्यांचा अपघाती मृत्यू झाला या घटनेमुळे अमरावती ग्रामीण पोलीस दलातही शोककळा पसरली आहे .