धक्कादायक ; हिंगोलीत पुन्हा २७ कोरोना पॉझिटिव्ह
धक्कादायक ; हिंगोलीत पुन्हा २७ कोरोना पॉझिटिव्ह
अँटीजन टेस्ट मध्ये चार रुग्ण आढळले ,दिवसेंदिवस आलेख वाढतोय
हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रात्री साडे आठ वाजता प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यामध्ये चार रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार श्रीवास यांनी दिली.
कोरोना रुग्ण आढळून आलेल्या पैकी हिंगोली पंचशीलनगर ६० वर्षीय एक पुरुष,मंगळवारा येथील दोन६३,५२,वर्षीय पुरुष, नवा मोंढा येथे दोन यात ४९,२०,पुरुष ,तालाब कट्टा येथील४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. गोलनदाज गल्ली येथील एका ३२ वर्ष पुरुष, इंदिरा नगर येथील एक २७ वर्ष पुरुष, काझीपुरा येथील५० वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय आझम कॉलनी येथील तिघे जण असून यात२४ स्त्री, दोन वर्षांची मुलगी, चार महिन्याचा मुलगा यांचा समावेश आहे.तसेच जुने पोलीस ठाणे येथील३०,६०,पुरुष तर २१ वर्षाच्या महिलेला लागण झाली आहे. साहू नगर येथे चार, तर जिल्हा परिषद वसाहत दोन, एसआरपीएफ एक, आखाडा बाळापूर तीन, स्त्री रुग्णालय क्वार्टर वसमत येथे एका २३ वर्षाच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे.
आज रोजी वीस रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये लिंबाळा व वसमत येथील सेंटर येथील रुग्णाचा समावेश आहे.
आतापर्यन्त जिल्ह्यात कोरोनाचे ५३३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३५४ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने घरी परतले आहेत. आजघडीला एकूण १७४ रुग्णावर उपचार सुरु आहेत. nपाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्हानंतर्गत आयसोलेशन वॉर्ड सर्व कोरोना सेंटर व गाव पातळीवर तयार कारण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर अंतर्गत एकूण ७०२६ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ६१७८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.६२३४ जणांना सुट्टी देण्यात आली. सद्यस्थितीला ८५५ रुग्ण भरती असून, आजरोजी ३६० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आयसो लेशन येथे भरती असलेल्या पैकी१३ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजन सुरु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.