चिंताजनक ; पुन्हा आणखी नव्याने २३ रुग्णाची भर

चिंताजनक ; पुन्हा आणखी नव्याने २३ रुग्णाची भर


तर अकरा रुग्ण कोरोनामुक्त


हिंगोली - रविवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने २३ रुग्णाची भर पडली असून ,अकरा कोविड रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली.


शहरातील खडकपुरा येथे आज ३४पुरुष,३४,३८,२१,स्त्री तर१५ वर्षीय मुलगी, दहा, व चार वर्षाच्या मुलीला कोरोना संसर्ग झाला असून ते सर्व जण कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. याचप्रमाणे तालाबकट्टा येथील६०,२१स्त्री,३०,३७ पुरुष ,११वर्षाची मुलगी हिला कोरोना बाधा झाली असून हे पण जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत.


तसेच सेनगाव  वॉर्ड क्रमांक एक बालाजी नगर येथील २५,२९,३५ वर्षीय स्त्री हे तिघे जण कोरोना संपर्कातील व्यक्ती आहेत. याशिवाय वसमत येथील स्वानंद कॉलनी येथील ४१ वर्षीय पुरुष यास ताप, सर्दी, खोकला येत असल्याने तपासणी करण्यात आली. आखाडा बाळापूर येथील ५०पुरुष,४६ वर्षीय स्त्री,१४ वर्षीय मुलगी तर कांडली येथील२४,व २३ पुरुषाला बाधा झाली आहे. तसेच पुणे येथून रेडगाव येथे परतलेल्या एका३० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे.


तसेच जिल्हा आयसोलेशन वॉर्ड येथील अकरा तर लिंबाळा येथील सात रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये आयसो लेशन  वॉर्डातील भरती असलेल्या पैकी दौडगाव दोन,तालाब कट्टा एक, गांधी चौक एक,असे चार रुग्ण तर लिंबाळा येथील सात रुग्ण असून यात कळमकोंडा चार,तालाब कट्टा एक,भांडेगाव एक,हनवतखेडा एक,यांचा समावेश आहे.आतापर्यन्त जिल्ह्यात ४१० रुग्ण बरे झाले आहेत.त्यापैकी ३१० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आजघडीला एकूण १०० रुग्णावर उपचार सुरु आहेत. औंढा येथे एक अंजनवाडी येथील एक रुग्ण भरती आहे.


जिल्हा समान्य रुग्णालयातील आयसो लेशन वॉर्डात एकूण २७ रुग्णावर  उपचार सुरु आहेत. यामध्ये रिसाला बाजार एक, जीएमसी  नांदेड एक, धूत औरंगाबाद एक, पेडगाव एक, शुक्रवार पेठ आठ, नव्हल गव्हाण एक,तालाब कट्टा दोन, गवळी पुरा एक, पेन्शन पुरा एक, अंजनवाडी एक, सेनगाव दोन, जयपूरवाडी एक,नवा मोंढा एक, कासार वाडा एक, आश्रम कॉलनी एक, पलटण एक, नारायण नगर एक, अशोक नगर एक यांचा समावेश आहे.तर वसमत येथील डेडीकेटेट कोविड सेंटर येथे २२ रुग्णावर उपचार सुरु असून ,वापटी एक, शुक्रवार पेठ सात, स्टेशन रोड तीन, सोमवार पेठ एक, सम्राट नगर पाच, गणेशपेठ एक, पारडी एक, गुलशन नगर एक, बहिर्जी नगर एक, स्वानंद कॉलनी एक, यांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथे एकूण दहा रुग्णावर उपचार सुरु असून यामध्ये नवी चिखली तीन, नांदापूर एक ,आखाडा बाळापूर तीन, कांडली दोन, रेडगाव एक, येथील रहिवासी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


लिंबाळा कोअर सेंटर अंतर्गत ३४ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये पेडगाव१४,रामा देऊळगाव पाच, पहेनी दोन, माळ धामणी एक, तालाब कट्टा पाच, खड्कपुरा सात यांचा समावेश आहे. तर सेनगाव येथे बस स्टँड जवळील दोन, बालाजी नगर दोन, वॉर्ड नंबर दहा समता नगर एक, आदींचा समावेश आहे.


जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड व गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर अंतर्गत एकूण ६३८४ रुग्णांना भरती करण्यात आले असून, त्यापैकी ५७४४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत,५४७६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना  सुट्टी देण्यात आली आहे.आजघडीला ८९१ व्यक्ती भरती असून २८९ रुग्णाचे अहवाल येणे बाकी आहे.तसेच सामान्य रुग्णालय आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरु असलेल्या पैकी चार रुग्णाची प्रकृती गंभीर असून, त्यांना ऑक्सिजन वर उपचार सुरू आहेत.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा