चिंताजनक ; हिंगोलीत बुधवारी नव्याने १४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले
चिंताजनक ; हिंगोलीत बुधवारी नव्याने १४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले
हिंगोली - येथील सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डातपेडगाव येथील ६० वर्षीय पुरुष सारीच्या आजाराने भरती होता. आज प्राप्त अहवालानुसार त्यास कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले आहे.तसेच सेनगाव, औंढा, कळमनुरी, लिंबाळा ,येथील रुग्णाचा समावेश असून बुधवारी अकरा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पस्ट झाले आहे.
अंधारवाडी येथील क्वारंटाइन येथील३२ वर्षीय महिला व एक वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट असून तो तलाब कट्टा येथील असून, जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. तसेच औंढा तालुक्यातील २५वर्षीय प्रसूती पश्चात महिला व५० वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असून या दोन्ही महिला औरंगाबाद येथून गावी परतल्या आहेत.
याशिवाय लिंबाळा क्वारंटाइन अंतर्गत भरती केलेल्या सहा रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून यात
हानवतखेडा येथील १८ वर्षीय पुरुष असून तो मुंबई वरून गावी परतला आहे. तर एक भांडेगाव येथील २६ वर्षीय युवक असून तो मुंबई वरून परतला आहे. तर इतर चार जण हे कळमकोंडा येथील रहिवासी असूनवाळूज औरंगाबाद येथून परतले आहेत. तसेच कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील दोन महिन्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली असून तिचे पालक ठाणे येथून परतले आहेत. तसेच सेनगाव क्वारंटाइन सेंटर येथील कौठा येथील एका१४वर्षीय मुलासह ४५ वर्षीय पुरुषाला
कोरोनाची लागण झाली आहे.ते वैताग वाडी येथील असून मुंबईवरून गावी परतले आहेत. आजघडीला नव्याने१४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचे ३१४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ५१ रुग्णावर उपचार सुरु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसो लेशन वॉर्डात एकूण दहा रुग्णावर तर वसमत येथे नऊ, कळमनुरी येथे आठ, रुग्णावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते. तसेच लिंबाळा अंतर्गत पंधरा तर सेनगाव येथे तीन कोविड रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर औंढा येथे सहा रुग्णावर उपचार सुरु आहेत.
जिल्हानंतर्गत आयसोलेशन वॉर्ड व गावपातळीवर एकूण ५४३६ रुग्णांना भरती करण्यात आले असून, त्यापैकी ४९०४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.४६२२रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला८०३ रुग्णावर उपचार सुरु असून २४९ जणांचे अहवाल येणे अद्यापही बाकी आहे.