हिंगोलीत नव्याने सहा रुग्णांना कोरोनाची बाधा


हिंगोलीत नव्याने सहा रुग्णांना कोरोनाची बाधा


हिंगोली -  हिंगोली, वसमत, सेनगाव येथे परतलेल्या नव्याने सहा रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल शनिवारी रात्री साडे आठ वाजता प्राप्त झाला आहे.


शहरातील रिसाला बाजार येथील एका७६ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले आहे.तसेच सेनगाव तालुक्यातील मकोडी येथीलएका२५ वर्षीय महिलेला कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने भरती करण्यात आले आहे.तर वसमत येथील चार रुग्णांना कोविडची लागण झाली आहे.यातील एक रुग्ण अंत्य विधी साठी आला होता.तो व्यक्ती हैद्राबाद येथून परतला होता.तर दुसरा नागाल्यांड येथे जवान असून तो रिधोरा येथे आला होता.तसेच रुग्ण क्रमांक तीन, चार दोन्ही महिला वसमत येथील विठ्ठल वाडी येथे मुंबई वरून परतल्या होत्या.आजरोजी एकूण सहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले आहे.


जिल्ह्यात कोरोनाचे २९५ रुग्ण झाले असून त्यापैकी२४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला एकूण ४७ रुग्णावर उपचार सुरू आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सहा तर वसमत येथे आठ,कळमनुरी येथे अकरा,हेल्थ सेंटर येथे पुन्हा 
दोन ,लिंबाळा येथे दहा तर सेनगाव येथे सहा, औंढा चार रुग्णावर उपचार सुरु आहेत.


दरम्यान,जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड व कोरोना सेंटर व गावपातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर अंतर्गत एकूण ५०४६ व्यक्तींना भरती करण्यात आले असून, त्यापैकी ४५०० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.४३२१ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला७१४ व्यक्ती रुग्णालयात भरती असून२८१ रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा