हिंगोली : नूतन सीओ डॉ. कुरुवाडे यांचा शहरात दुचाकीवर फेरफटका 


नूतन सीओ डॉ. कुरुवाडे यांचा शहरात दुचाकीवर फेरफटका 


कन्टेन्टमेन्ट झोनची पाहणी ,
कोरोनाचा घेतला आढावा


हिंगोली - येथील पालिकेचे नूतन सीओ डॉ. अजय कुरुवाडे यांनी पालिकेचा पदभार घेताच बुधवारी चक्क मोटारसायकल वर शहरात फेरफटका मारून रुग्ण आढळलेल्या कन्टेन्टमेन्ट झोनची पाहणी करून कोरोना संसर्ग चा आढावा घेतला.


रामदास पाटील यांची मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदी प्रमोशन झाल्याने त्यांच्या रिक्त जागी वाशिम जिल्ह्यातील कारंजा पालिकेचे डॉ. अजय कुरवाडे यांची शासनाने बदली केली. मंगळवारी कुरुवाडे यांनी आपल्या पदाचा पदभार घेऊन शहरातील चालू विकास कामांचा आढावा घेतला. तसेच कोरोना बाबत किती कन्टेन्ट मेन्ट झोन असून कुठे कुठे रुग्ण आढळले आहेत याची माहिती घेतली. बुधवारी  दुसऱ्या दिवशीच चक्क मोटारसायकलवर स्वारी करीत शहरात चालू असलेली कामे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्ण आढळून आलेल्या भागाची पाहणी केली.


जिल्ह्यात कोरोनाचे त्रिशतक पूर्ण झाले असून यातील२६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला६३ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु आहेत. हिंगोली शहरातील मस्तांशाह, गाडीपुरा, रिसाला, तलाबकट्टा भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने हा भाग कन्टेन्ट मेन्ट घोषित केला असून शील केला आहे. या भागातील नागरिकांची घरो घरी जाऊन आरोग्य यंत्रणेकडून तपासणी केली जात आहे.यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक दिनेश चौधरी, बाळू बांगर, चंदू लव्हाळे ,नगर अभियंता रत्नाकर अडसीरे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, नूतन सीओ डॉ. अजय कुरुवाडे यांनी पदभार घेतल्यानंतर शहरातून मोटारसायकलवर फेरफटका मारल्याने रामदास पाटील यांच्या पावलावर पाय ठेवून शहरातील विकासकामांना प्राध्यान्य देतील का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.कुरुवाडे स्वतः मोटारसायकलवर  शहरातील विकासकामांची माहिती घेण्यासाठी निघाले असता बऱ्याच जणांना हे अधिकारी आहेत म्हणून कुतूहल वाटले. याबाबत त्यांनी संचार बंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा