पालिका कर्मचारी संघटनेचे काळ्या फिती लावून शासनाचा निषेध तर ११ऑगस्टला राज्यभरात एक दिवसीय कामबंद आंदोलन करणार


पालिका कर्मचारी संघटनेचे काळ्या फिती लावून शासनाचा निषेध  तर ११ऑगस्टला राज्यभरात एक दिवसीय कामबंद आंदोलन करणार


हिंगोली,- पालिका कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कार्यालया प्रमाणे कोषागार मार्फत वेतन अदा करावे, मंजूर पदानूसार सहाय्यक अनुदान देण्यात यावे, आशा विविध मागण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटनेने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता.२७) पालिके समोर काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास दुसऱ्या टप्यात येत्या ११ ऑगस्ट रोजी राज्यभरात एक दिवसीय कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने राज्य शासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.


पालिका,महापालिका, नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षापासून शासन स्तरावर प्रलंबित पडल्या आहेत.त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी संघटनेचे राज्यध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्फत राज्य शासनाला निवेदन पाठवून पालिकेसमोर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला आहे. यावेळी घोषणा बाजी करण्यात आली. या वेळी पाच ही तालुक्यात निवेदन देऊन २६४ कर्मचारी सहभागी झाले होते.


राज्य शासनाकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन लागू केला आहे. तो अद्याप दिला नाही. तो तत्काळ दयावा,२०११ च्या आकृती बंधानुसार बदल करून आकृतीबंध वाढवून दयावा, नगरपालिका, पंचायत, महापालिका कर्मचाऱ्यांना संवर्ग व स्थानिक कर्मचाऱ्यांना अनुकम्पाचा आदेश दयावा, आशा विविध मागण्यासाठी संघटनेने शासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र अद्याप पर्यंत एकही मागणी पूर्ण झाली नाही. आता पहिल्या टप्यात  काळ्या फिती लावून हल्लाबोल निषेध आंदोलन करण्यात आले. तर मागण्या मान्य न झाल्यास दुसऱ्या टप्यात ११ ऑगस्ट रोजी एक दिवसीय कामबंद आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे राज्यध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे के.के.आंधळे, आनंद दायमा, भगवान बोडखे, विजय पाटील, आनंद मोरे, अन्सारी मुजमिल ,मस्के यांच्यासह पन्नास कर्मचारी सहभागी झाले होते.याचप्रमाणे कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा याठिकाणी ही कर्मचाऱ्यांनी निवेदन देत काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला. जिल्ह्यात २६४ कर्मचारी सहभागी झाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा