समाधानकारक ; हिंगोलीत रविवारी दोन कोरोना रुग्णांची भर, आठ रुग्णांना डिस्चार्ज

समाधानकारक ; हिंगोलीत रविवारी दोन कोरोना रुग्णांची भर, आठ रुग्णांना डिस्चार्ज


८० वर्षाच्या एका पुरुषाचा सारीच्या आजाराने मृत्यू


हिंगोली -  आज रोजी हिंगोली जिल्हयामध्ये नव्याने एकुन दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. आणि आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय  येथे एका ८० वर्षाच्या पुरुषाचा  सारीच्या आजाराने मृत्यु झाला आहे .तर आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी रविवारी  दिली.


 आज आढळलेल्या रुग्णात  सेनगाव येथील  ५५ वर्षीय महिला गणेशपेठ , वसमत येथील ३२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथील आयसोलेशन वार्ड मध्ये एका ८० वर्षीय पुरुष राहणार तोफखाना हिंगोली यांचा आज सकाळी सारीच्या आजाराने मृत्यु झाला . 


 आज रोजी ८ कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज करण्यात आले आहे . यामध्ये ३ कोरोना रुग्ण ( पेडगाव ) येथील असून हे कोरोना केअर सेंटर लिंबाळा , हिंगोली मधील आहेत.  तर  ५ कोरोना रुग्ण ( ४ शुक्रवार पेठ वसमत , १ कासारवाडा हिंगोली ) यांना आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली मधुन डिस्चार्ज झाला आहे . 


 आज रोजी हिंगोली जिल्हयात २ नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . ८ कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आह . आज पर्यंत हिंगोली जिल्हयात कोरोनाचे  एकुण ५५८ रुग्ण झाले आहेत . त्यापैकी ३६६ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन १८६ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ६ कोऱोना रुग्णाचा मृत्यु झाला आहे .  हिंगोली जिल्हयातंर्गत आयसोलेशन वार्ड , सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन ७१०६ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे . त्यापैकी ६३५ ९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत . ६४८६ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सद्यस्थितीला ५८ ९ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी २३३ अहवाल येणे ,  स्वॅब घेणे प्रलंबित आहे . ६ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे .


आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १२ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजन चालु आहे . • हिंगोलीतील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , ज्यांना मधुमेह , उच्च रक्तदाब , श्वासाचे विकार , कॅसर इ . दुरधर आजार आहेत , यांनी आरोग्याची विषेश काळजी घ्यावी व काही त्रास झाल्यास तात्काळ जवळच्या उपकेंद्र ( सामुदाय आरोग्य अधिकारी मार्फत ) , प्राथमीक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालय , जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य तपासणी करुन घ्यावी तसेच अत्यंत महत्त्वाचे असल्याशिवाय घरा बाहेर पडू नये व अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबुन मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा