हिंगोली : कर्नाटकहुन परतलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण हिंगोलीची त्रिशतकाकडे वाटचाल
कर्नाटकहुन परतलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण
हिंगोलीची त्रिशतकाकडे वाटचाल
हिंगोली - आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार गुलबरगा कर्नाटक येथून मस्तानशहा नगर येथे परतलेल्या २२ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे.तर औंढा नागनाथ येथील भोसी येथील एकाने कोरोनावर मात केल्याने त्यास सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यन्त कोरोनाने
त्रिशतकी आकडा पार केला त्यापैकी २५२ रुग्ण बरे झाले आहेत.आजघडीला ४५ रुग्णावर उपचार सुरु आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा रुग्णांना भरती करण्यात आले आहे. यात रिसाला एक, मकोडी एक,बहिर्जी दोन, गांधी चौक दोनयांचा समावेश आहे. तर वसमत येथे आठ तर कळमनुरी येथील कोरोना सेंटर येथे १२ याशिवाय डेडी केटेट येथे एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.तसेच लिंबाळा येथे सात रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर सेनगाव कोरोना सेंटर येथे सहा रुग्णावर उपचार सुरू आहेत. याशिवाय औंढा येथे चार रुग्णावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात गाव पातळीवर ५२६२ रुग्णांना भरती करण्यात आले असून, त्यापैकी ४६७० रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.४४२८ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ८१४ रुग्ण भरती असून ३२८ रुग्णावर उपचार सुरू आहेत.