हिंगोलीत मंगळवारी आणखी १० रुग्ण बाधित , तेरा रुग्णांना सुट्टी आतापर्यन्त सहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
हिंगोलीत मंगळवारी आणखी १० रुग्ण बाधित , तेरा रुग्णांना सुट्टी
आतापर्यन्त सहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
हिंगोली - जिल्हयात प्राप्त आकडेवारीनुसार मंगळवारी नव्याने एकुन १० बाधित रुग्ण आढळुन आले आहेत. तर १३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यन्त जिल्ह्यात सहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
जिल्हा रुग्णालयाकडून मंगळवारी प्राप्त अहवालानुसार तेरा कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे . यामध्ये पाच रुग्ण सेनगाव येथील आहेत. तर कळमनुरी कोरोना केअर सेंटर तीन,वसमत दोन, जिल्हा सामान्य आयसोलेशन वॉर्डातील तीन यांचा समावेश आहे.
आज रोजी हिंगोली जिल्हयात १० नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . यामध्ये हिंगोली महादेववाडी ३५पुरुष, पेन्शनपुरा येथील१५वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तोफखाना येथे दोन ३५पुरुष, २७वर्ष महिला, श्रीनगर येथे ८० वर्ष पुरुष,यशवंतनगर ४२ वर्ष पुरुष, गाडीपुरा येथे साठ वर्षाची महिला,तर अष्टविनायक नगर येथे ४० वर्ष महिला, हिंगोली तालुक्यातील सवड येथे एका २८ वर्ष पुरुष ,वसमत येथील मंगळवार पेठ येथील४० वर्ष पुरुषाचा समावेश आहे.
हिंगोली जिल्हयात कोरोनाचे एकुण ५८५ रुग्ण झाले आहेत . त्यापैकी ३८५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन १९४ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ६ कोऱोना रुग्णाचा मृत्यु झाला आहे . हिंगोली जिल्हयातंर्गत आयसोलेशन वार्ड , सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन
७२०१ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे . त्यापैकी ६४३९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत . ६५८९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सद्यस्थितीला ५८९ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी २०९ जणांचे अहवाल येणे , स्वॅब घेणे प्रलंबित आहे . ६ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे .
आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. तर एका २८वर्ष रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्याला बायप्यापमशीनवर ठेवण्यात आले आहे. एकूण १५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.