हिंगोली : पुन्हा मुंबई कनेक्शन ; रशिया येथून परतलेल्यासह पाच जणांना कोरोनाची लागण


पुन्हा मुंबई कनेक्शन ; रशिया येथून परतलेल्यासह पाच जणांना कोरोनाची लागण


कोरोना बाधितांची संख्या गेली३८ वर


हिंगोली -   बुधवारी प्राप्त अहवालानुसार एक २३ वर्षीय तरुण  रशिया वरून पिंपळ खुटा येथे आला असून, त्यासह इतर पाच जण मुंबई, परभणी वरून हिंगोलीत दाखल झाले.त्यामुळे सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.


वसमत येथील एका चाळीस वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट असताना तो व्यक्ती पुन्हा परभणी येथे शिक्षक असल्याने (ता.२५) परभणी येथे जाऊन आला त्यानंतर (ता.२७) रोजी त्याच्या आई सोबत नांदेड येथील खाजगी रुग्णालयात जाऊन आला. त्यास ताप, सर्दी, खोकला आल्यामुळे त्याचा स्वाब तपासण्यासाठी पाठविला आहे. त्यानंतर शहरातील लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटर येथे भरती असलेला चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले आहे. यामध्ये रशिया येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेला तरुण हा पिंपळखुटा येथील रहिवासी आहे. तर दुसरा मुंबई येथून प्रगती नगर येथे परतला आहे. तसेच एक जण मुंबई येथून भांडेगाव येथे परतला आहे.


याशिवाय औंढा येथील क्वारंटाइन सेंटर येथून एका चार वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरून स्पस्ट झाले. सदरील बालक हा भोसी गावातील रहिवासी आहे. आणि तो भरती असलेल्या दोन कोविड रुग्णा सोबत एका गाडीने मुंबई येथून गावी परतला आहे. आजघडीला एकूण सहा रुग्णाला कोरोना बाधा झाली आहे.


जिल्ह्यात कोरोनाचे २७६ रुग्ण झाले असून त्यापैकी२३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला एकूण३८ रुग्णावर उपचार सुरू आहेत.तसेच वसमत येथे तीन रुग्णावर उपचार सुरु आहेत.तर कळमनुरी येथे१५ रुग्णावर उपचार सुरू आहेत.तर डेडीकेटेट हेल्थ सेंटर येथे दोन रुग्ण आहेत. याशिवाय लिंबाळा येथे दहा रुग्ण भरती असून उपचार सुरु आहेत. तर सेनगाव येथे पाच, तर औंढा येथे तीन रुग्ण भरती आहेत.


जिल्ह्यात ४७६० व्यक्तींना भरती करण्यात आले असून, त्यापैकी४२६४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.४२३१ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. सद्य स्थितीला ५२८ व्यक्ती भरती असून २५७ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा