हिंगोली : संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा ८८ टक्के निकाल
संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा ८८ टक्के निकाल
यंदा ही उज्वल यशाची परंपरा कायम
कनेरगाव - हिंगोली तालुक्यातील
कनेरगाव नाका येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल८८ टक्के लागला असून ,मागील वर्षी प्रमाणे यंदाही या महाविद्यालयाने तालुक्यात बाजी मारली असून उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
नुकताच बारावी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचा निकाल लागला असून, या महाविद्यालयातील आदित्य देशमुख हा विद्यार्थी मुलामधून प्रथम आला असून त्याला८८.९०टक्के गुण मिळाले आहेत. तर विज्ञान शाखेतून मुली मधून दिशा नीलकंठ गायकवाड हीने८५.०७ टक्के गुण मिळविले आहे. त्यापाठोपाठ आदित्य तळोकर ७६ टक्के ,अनुज मोहिरे ७६टक्के, kumari वल्लापिल एलिझाबेद ७५.८५ टक्के ,धवल बंग ७४.५,कुमारी ममता भागत ६९ टक्के ,प्रकाश खंदारे ७१ टक्के, तर कला शाखेतून ज्योती गावंडे ६५ टक्के गुण,कुमारी वाघमारे प्रतीक्षा ६४ टक्के ,सागर गावडे६१ टक्के ,कुमारी वैशाली डवळे ६० टक्के गुण मिळवून महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे.
दरम्यान, रविवारी सरस्वती नगर येथे दिशा गायकवाड, आदित्य देशमुख, वल्लपिल एलीझाबेद या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पालकसमवेत ज्ञानेश्वर ठाकरे, कृष्णाई ठाकरे यांनी केला. यावेळी पालक निलखंठ गायकवाड, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश वानखेडे आदींची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरी भागाकडे यावे लागत असत. विद्यार्थ्यांची, पालकांची गरज ओळखून ग्रामीण भागातील मुला मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जय जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सुरु करून संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दारे उघडून दिली. या महाविद्यालयात कला शाखे बरोबर, विज्ञान शाखा व विज्ञान शाखेमध्ये जनरल सायन्स, क्रॉप सायन्स, कम्प्युटर सायन्स असे अभ्यासक्रमाची सोय करून दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावी नंतर वाशिम, हिंगोली कडे न जाता कण्हेरगाव येथे ज्युनिअर कॉलेज सुरु केल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आहे.