हिंगोली : जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी ,मुख्याध्यापकांच्या रिक्त पदे भरा

 



जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी ,मुख्याध्यापकांच्या रिक्त पदे भरा


शिक्षण सभापती चव्हाण यांनी घातले पालकमंत्र्यांना साकडे


हिंगोली - कोरोना संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन सुरु आहे. परंतु जुलै महिना अर्ध्यावर आला तरीही शाळा सुरु नाहीत, त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरु करून गटशिक्षणाधिकारी ,केंद्र प्रमुखांची असलेली रिक्त पदे भरावीत यासाठी शुक्रवारी (ता.१०) शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांनी पालकमंत्री गायकवाड यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.


जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या दोन दिवसांच्या हिंगोली दौऱ्यावर आल्या आहेत. त्या कोरोना संदर्भात विविध कोरोना केअर सेंटरला भेटी दिल्या, जिल्ह्यातील वाढत्या रुग्णाचा तसेच पीक कर्ज वाटपा बाबत बँकेकडून होत असलेली उदासीनता या बाबीवर आढावा घेतला.


गेली तीन महिन्यापासून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला आहे. तर काही आस्थापणाना यात मुभा देण्यात आली आहे. मात्र शाळा, कॉलेज कोरोनाच्या भीतीमुळे अद्यापही बंद आहेत. याबाबत शुक्रवारी येथील विश्राम गृहात जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांनी पालकमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यात त्यांनी नमूद केले की, जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये सुरु करावीत, विद्यार्थ्यांना मास्क चा पुरवठा करावा, संपूर्ण शाळेतील वर्ग खोल्यात सानिटायझर फवारणी करावी, जिल्ह्यातील उपशिक्षणाधिकारी ,गट शिक्षणाधिकारी ,राजपत्रित मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख ,विषय शिक्षक, उच्यश्रेणी मुख्याध्यापक , आदी मागण्याचा समावेश आहे. ही सर्व पदे अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत असल्याची पालकांत भीती पसरली आहे. तर केंद्र प्रमुखाकडे अतिरिक्त पदभार असल्याने तो काढून बीए, बीएड पात्रता धारकानाच दयावा अशी मागणी निवेदनाद्वारे सभापती रत्नमाला चव्हाण यांनी केली आहे. यावेळी पालकमंत्री गायकवाड यांनी सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे अश्वासन दिले. यावेळी खासदार राजीव सातव, प्रभाकर चव्हाण यांची उपस्थिती होती.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा