वसमत येथील ३३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण
पुन्हा पुणे कनेक्शन ; वसमत येथील ३३वर्षीय महिलेला कोरोनाची लागण
रुग्ण संख्या पोहचली ३६२ वर
हिंगोली - पुणे येथून वसमत येथे गावी परतलेल्या एका३३ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला असून त्या महिलेस क्वारंटाइन केले होते.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ३६२ वर पोहचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यन्त ३६२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २९२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजमितीला ७० कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालय आयसो लेशन वॉर्ड अंतर्गत सतरा रुग्णांना भरती करण्यात आले आहे. यामध्ये. रिसाला एक, गांधी चौक एक, जीएमसी एक, पेडगाव एक, शुक्रवार पेठ दोन, नव्हल गव्हाण एक, तालाब कट्टा तीन, दौडगाव दोन, गवळीपुरा एक, पेन्शन पुरा एक, अंधारवाडी एक, सेनगाव एक, जयपूर वाडी एक यांचा समावेश आहे. तर वसमत येथील डेडी केटेट कोअर सेंटर येथे सहा रुग्ण भरती असून यात जय नगर एक, वापटी एक, शुक्रवार पेठ सात, स्टेशन रोड दोन, सोमवार पेठ एक, सम्राट नगर चार, अशोक नगर एक, गणेशपेठ एक, पारडी एक, यांचा समावेश आहे.
तसेच कळमनुरी येथे एकूण सहा रुग्णावर उपचार सुरु असून, नवी चिखली तीन,डिग्रस एक, शेवाळा एक, नांदापूर एक, यांचा समावेश आहे. याशिवाय लिंबाळा अंतर्गत कोरोना सेंटर येथे२६रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये तालाब कट्टा एक, भांडेगाव दोन, हनवतखेडा एक, कलम कोंडा चार, पेडगाव अकरा,रामा देऊळगाव पाच,पहेनी दोन, माळ धामणी एक,यांचा समावेश आहे.सेनगाव येथे वैतागवाडी येथील दोन रुग्णावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात गावपातळीवर तसेच क्वारं टाइन सेंटर अंतर्गत ६०७७ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ५४६७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.५३५७ व्यक्तींना घरी सुट्टी देण्यात आली आहे.आजघडीला ७४२ रुग्ण भरती असून,२९८ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णा पैकी दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तसेच दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायप्याप मशीनवर ठेवले आहे. तसेच चार रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.