धक्कादायक ;  हिंगोलीत शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ५६ रुग्ण बाधित


धक्कादायक ;  हिंगोलीत शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ५६ रुग्ण बाधित


 ५ रुग्ण बरे तर एका ८० वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू
 
हिंगोली -  जिल्हयात प्राप्त आकडेवारीनुसार शुक्रवारी तब्बल नव्याने एकुन ५६  बाधित रुग्ण आढळुन आले आहेत. तर पाच रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.तर यातील आठ रुग्ण अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले असून, श्रीनगर येथील एका ८० वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी पत्रकारांना दिली.


जिल्हा रुग्णालयाकडून गुरुवारी प्राप्त अहवालानुसार  पाच कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे . यामध्ये कळमनुरी कोरोना सेंटर येथील दोन,वसमत दोन, लिंबाळा यांचा समावेश आहे. आज रोजी हिंगोली जिल्हयात ५६  नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . यामध्ये हिंगोली शहरातील देव गल्ली येथील एक पुरुष, जिल्हा परिषद वसाहत तीन यात एक पुरुष, एक स्त्री, तेरा वर्षाची एक मुलगी, तोफखाना एक, मंगळवारा एक, सवड एक, चोंडी स्टेशन वसमत एक,जवाहर कॉलनी वसमत एक,एसआरपीएफ हिंगोली येथील ३३ जवान, जवाहर कॉलनी वसमत चार, बँक कॉलनी वसमत चार, मंगळवारा पेठ वसमत चार,स्त्री रुग्णालय वसमत निवस्थान एक,पतंगे कॉलेज वसमत एक, शेवाळा कळमनुरी एक, बुरसे गल्ली कळमनुरी एक ,अशा ५६ बाधित रुग्णांचा समावेश आहे. तर श्रीनगर हिंगोली येथील ८० वर्षाच्या पुरुषाचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे.


हिंगोली जिल्हयात कोरोनाचे  एकुण ६५४ रुग्ण झाले आहेत . त्यापैकी ४३५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन २११ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ८ कोऱोना रुग्णाचा मृत्यु झाला आहे .  हिंगोली जिल्हयातंर्गत आयसोलेशन वार्ड , सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन 
७४५१ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे . त्यापैकी ६६६२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत . ६९६२ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सद्यस्थितीला ५०५ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी १६०  जणांचे अहवाल येणे ,  स्वॅब घेणे प्रलंबित आहे . ८  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे .


आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १९ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. तर दोन रुग्णाची अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायप्याप मशीन वर ठेवले आहे. एकूण २१ रुग्णाची
प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा