आरोग्य विभागातील ४५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाइन

आरोग्य विभागातील ४५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाइन


 


हिंगोली -  येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शुक्रवारी जिल्हा परिषद सील करून सानिटायझरने संपूर्ण इमारत फवारली आहे. मात्र हा परिसर कन्टेन्टमेन्ट झोन करणे आवश्यक असताना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी टाळाटाळ केली आहे. उद्या जिल्हा परिषदेमध्ये रुग्ण वाढल्यास याचे खापर कोणावर फोडणार याचे उत्तर अनुत्तरित आहे.


जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका डॉक्टरला ताप, खोकला, शिंका येत असल्याने तो आजारी पडला होता. त्यामुळे तो सामान्य रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता कोरोनाचे लक्षणे दिसून आल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांचे स्वाब नमुने घेऊन नांदेड येथील प्रयोग शाळेकडे पाठविले. शुक्रवारी अहवाल प्राप्त होताच तो डॉक्टर पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यास आयसोलेशन वॉर्डात दाखल करून उपचार सुरू केले आहेत.


दरम्यान, आरोग्य विभागातील डॉक्टर पॉझिटिव्ह निघाल्याचा अहवाल येताच आरोग्य विभागातील चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांची यादी डॉ. शिवाजी पवार यांनी केली. या सर्वांचे स्वाब नमुने घेऊन प्रयोग शाळेकडे पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. डेप्युटी सीईओ धनवंत कुमार माळी यांनी दक्षता घेत सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाहेर काढत जिल्हा परिषदेची इमारत पाहता पाहता पाच मिनिटात खाली करून इमारतीला सील केले. काही वेळाने सर्व इमारत सानिटायझरच्या साहाय्याने फवारून घेतली.


शनिवारी आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह चाळीस कर्मचाऱ्यांना  काळजी म्हणून सेनगाव तालुक्यातील कवठा प्राथमिक आरोग्य केंद्रातील इमारतीत चौदा दिवसासाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. या सर्व कर्मचारी यांचे स्वाब नमुने प्रयोग शाळेकडे पाठविले आहेत.


परंतु जिल्हा परिषदेमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने हा परिसर कन्टेन्टमेन्ट झोन करणे अपेक्षित असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यांच्याकडे शहरी भागाची जबादारी असताना हा परिसर कन्टेन्ट मेन्ट झोन म्हणून करण्यासाठी साधे पत्र ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांनी का टाळाटाळ केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर उद्या याच इमारतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यास याची जबादारी कोणावर राहणार हाही महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक यांची चूक उद्या महागात पडणार असल्याचे बोलले जात आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा