कोरोणाला हरवण्यात हिंगोली राज्यात अव्वल
करोना रूग्ण बरे होण्यात हिंगोली राज्यात अव्वल
हिंगोली - कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या रिकव्हरी रेट मध्ये महाराष्ट्रातुन हिंगोली जिल्हा पहिल्या क्रमांकावर आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी 'मराठवाडा केशरी' शी बोलताना दिली.
सध्या देशात तथा राज्यात व हिंगोली जिल्हयात परराज्यातुन , मेट्रोसीटीतुन दिनांक 14 मार्च पासुन ते ता.
07 जुलै पर्यंत जिल्हयात 47,766 नागरिक आले असुन या संपुर्ण नागरिकांची वैद्यकिय अधिकारी , समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य कर्मचारी , आशा स्वयंसेविका यांचे मार्फत तपासणी कण्यात आली .
यामध्ये कोरोना या आजाराची चिन्हे , लक्षणे आढळून आल्यास , त्यांना शासकिय क्वॉरन्टाईन करुन त्या व्यक्तीचा थ्रोट स्वॅब घेउन वैदकिय महाविद्यालय नांदेड येथे पाठविण्यात येत होते . तसेच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली , पोलिस अधिक्षक , उपविभागीय अधिकारी , जिल्हा शल्यचिकित्सक , जिल्हा आरोग्य अधिकारी , निवासी वैद्यकिय अधिकारी , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी , तहसिलदार , मुखाधिकारी नगर परिषद यांच्या नियंत्रणाखाली जिल्हयातील 1008 आशा स्वयंसेविका , 37 गटप्रवर्तक , 1214 अंगणवाडी कार्यकर्त्या , 503 आरोग्य कर्मचारी , 119 समुदाय आरोग्य अधिकारी , 64 वैद्यकिय आरोग्य अधिकारी व 5 तालुका आरोग्य अधिकारी या सर्वांच्या कठोर परिश्रमामुळे व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्या सर्वांच्या सहकार्याने तसेच आरोग्य विभागामार्फत कोरोना विषाणूजन्य आजाराची कोरोना एक्सप्रसव्दारे जिल्हयातील जास्तीत जास्त गावामध्ये जाउन जनजागृती करण्यात आली व आरोग्य शिक्षण देण्यात आले .
या सर्व परिश्रमाने आज जिल्हयात कोरोना आजाराचे 297 व्यक्तींना लागण झालेली असुन त्यापैकी 252 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला व आज रोजी 45 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार चालु असुन त्यांची प्रकृती चांगली आहे .संचालक आरोग्य सेवा पुणे -2 यांच्या अहवालानुसार हिंगोली जिल्हा कोरोना विषाणूजन्य आजाराच्या रिकव्हरी रेट मध्ये महाराष्ट्रातुन पहिल्या क्रमांकावर आलेला आहे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे .
तसेच मृत्यूच्या दरामध्ये आपल्या जिल्हयाचे महाराष्ट्रातील 35 जिल्हयामध्ये शेवटच्या तीसऱ्या क्रमांकावर असुन हिंगोली जिल्हयाचे मृत्यूचे प्रमाण हे 0.3 एवढे आहे . महाराष्ट्रातील इतर जिल्हयाच्या तुलनेनुसार हिंगोली जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचे रुग्णांच्या संख्येमध्ये दुप्पट होण्याचे प्रमाण हे 42 दिवसानंतरचे आहे .
जिल्हातील तालुका आरोग्य अधिकारी , वैद्यकिय अधिकारी समादाय आरोग्य अधिकारी , आरोग्य कर्मचारी , अंगणवाडी , सर्व कर्मचाऱ्यांचे व नियंत्राण अधिकारी यांच्या अथक परिश्रमाचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास सर्वांना शुभेच्छा दिल्या .