परभणी जिल्ह्यात आणखी तीन रुग्ण वाढले
परभणी जिल्ह्यात आणखी तीन रुग्ण वाढले
परभणीतील ममता कॉलनी रामकृष्ण नगरातील दोघांचा समावेश; पाथरीत एक
परभणी / प्रतिनिधी
गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल मंगळवारी दिनांक 30 जूनच्या रात्री उशिरा, सोनपेठ येथे नोकरीस असलेला व परभणीत एकजण ममता कॉलनी येथे वास्तव्यास असलेला एक 44 वर्षीय पुरुष आणि पाथरी येथील आनंद नगर येथे 29 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.तसेच परभणीतील रामकृष्ण नगरातील युवती असे 3 नवीन रुग्ण आढळले आहेतजिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 118 झाली आहे यातील युवती आधीच्या पाॕझिटिव्ह रुग्णाची हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहे. ती परभणी शहरातील रामकृष्ण नगरातील रहिवासी आहे. परभणी जिल्ह्यात आता एकूण पाॕझिटिव्ह 118 रुग्णांची नोंद झाली आहे. यातील चार जणांचा यापूर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान 91 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.