नाग पंचमीचा संदेश -- साप वाचवा पर्यावरण वाचवा
साप वाचवा पर्यावरण वाचवा
अहमदपूर (बालाजी काळे) : वन्यजीव रक्षक सेवाभावी संस्था उदगीर अंतर्गत कार्य करीत असलेले सर्पमित्र सिद्धार्थ काळे शेलदरा ता.जळकोट व महेंद्र गायकवाड धानोरा खु. ता अहमदपुर यांनी नागपंचमी च्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देत जीवीत सापाची पुजा न करता त्याला दुध न देता सापाच्या मुर्तीची पुजा करा नागपंचमी निमित्ताने समाजामध्ये सापाविषयी असलेले गैरसमज, अंधश्रद्धा सर्पमित्र सिद्धार्थ काळे व महेंद्र गायकवाड यांनी खालील प्रमाणे सांगितले आहेत
सापांबद्दल आपल्याकडे बरयाच निराधार कपोलकल्पित गोष्टी सांगितल्या जातात खरे तर साप हा उपयुक्त असला तरी त्याला गैरसमजामुळे शत्रु ठरवून आपण मोकळे झालो आहोत आज होणार्या नागपंचमीच्या निमित्ताने नागांना समजून घेण्याची खरी गरज आहेनागपंचमीला नागाची पूजा केली जाते नागाला जगातील अनेक देशांनी देवाचे स्थान दिलेले आहेआपल्या देशामध्ये हजारो वर्षांपासून आर्य भारतात येण्यापूर्वी येथे असलेल्या द्रविड संस्कृतीत नागांची पुजा केली जात होती याचे उदाहरण म्हणजे मोहेंजोदडो येथील उत्खननामध्ये नागप्रतिमा सापडल्या असल्याने पाच-सहा हजार वर्षापूर्वी नागपुजा होत असल्याचे सिद्ध होते परंतु यामध्ये श्रद्धे पेक्षा अंधश्रद्धा चालू जास्त आहे साप म्हणजे मरण ही कल्पना लोकांच्या मनात ईतकी खोलवर रुजली आहे की,साप म्हणताच अनेकांचे आवसान गळते सापांविषयी अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत साप डुख(डावा) धरतात हा एक गैरसमज आहे या समजुतीला कोणताही आधार नाही सापांचे विष मंत्राने आणी काही प्रकारच्या जडीबुटी ने उतरते या घातक अंधश्रद्धेपायी देशात दरवर्षी हजारों लोक मृत्युमुखी पडतात सापाच्या विषावर प्रतीसर्प विष हेच एकमेव औषध आहे* अनेक मांत्रिक किंवा गारूडी सापाचे विष उतरवीणा औषध म्हणून जडीबुटी,नागवेली,भस्मे,अंगारे,
आपल्या अशा अनेक अंधश्रद्धा आणी मुर्खपणामुळे सापाच्या अनेक जाती नामशेष झाल्या आहेत नागपंचमीच्या दिवशी फक्त त्याची पुजा करण्या ऐवजी सापांना समजावुन घेवु या मनातील अंधश्रद्धा दुर सारु या
सर्पमित्र सिद्धार्थ काळे व सर्पमित्र महेंद्र गायकवाड संपर्क मो.नं.९६२३७२९४३८