हिंगोलीत नव्याने अकरा जणांना कोरोनाची लागण यातील पाच रुग्णांना सारीचा आजार
हिंगोलीत नव्याने अकरा जणांना कोरोनाची लागण
यातील पाच रुग्णांना सारीचा आजार ,दोन रुग्ण अतिगंभीर
हिंगोली - जिल्ह्यात गुरुवारी प्राप्त अहवालानुसार नव्याने ११ कोरोनाचे रुग्ण आढळुन आले असून यातील पाच रुग्णांना सारीचा आजार झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दाखल रुग्णापैकी दोघे जण अतिगंभीर असल्याचे डॉ श्रीवास यांनी सांगितले.
यामध्ये शहरातील कासारवाडा येथील ६५ वर्षीय पुरूष सारीच्या आजाराने जिल्हा रुग्णालयात भरती आहे. त्याला बाहेर गावावरून येण्याचा पुर्व इतिहास नाही.नवा मोंढा पोस्ट ऑफिस जवळील ७७ वर्षीय पुरुष सारीच्या आजाराने जिल्हा रुग्णालयात भरती आहे . बाहेर गावावरुन येण्याचा पुर्वइतिहास नाही. ५८ वर्षीय पुरुष आझम कॉलनी येथील असुन तो सारी च्या आजाराने भरती आहे . बाहेर गावावरुन येण्याचा पुर्वइतिहास नाही.
वसमत येथील ब्राह्मण गल्ली येथील ४५ वर्षीय पुरुष सारीच्या आजाराने जिल्हा रुग्णालयात येथे भरती आहे . बाहेर गावावरुन येण्याचा पुर्वइतिहास नाही ३२ वर्षीय महिला गुलशन नगर , सारी च्या आजाराने उप जिल्हा रूग्णालय वसमत येथे भरती आहे . बाहेर गावावरून येण्याचा पुर्वइतिहास नाही ६३ वर्षीय पुरुष जुमा पेठ , वसमत सारीच्या आजाराने वसमत येथे भरती आहे . बाहेर गावावरुन येण्याचा पुर्वइतिहास नाही तसेच ४० वर्षीय महिला सम्राट कॉलनी , कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहे.तसेच १५ वर्षीय मुलगा कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील आहे.
पेडगाव , हिंगोली येथील ३२ वर्षीय स्त्री , ५० वर्षीय स्त्री , ३२ वर्षीय स्त्री आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी २ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजन चालु आहे . तसेच २ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे .
अशा प्रकारे ४ कोरोना रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे आज पर्यंत हिंगोली जिल्हयात कोरोनाचे एकुण ३७३ रुग्ण झाले आहेत . त्यापैकी २९२ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन ८१ रुग्णांवर उपचार चालु असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.