हिंगोलीत एकाच दिवसात अकरा जणांना कोरोनाची बाधा
हिंगोलीत एकाच दिवसात अकरा जणांना कोरोनाची बाधा
हिंगोली - आज रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्हांतर्गत नव्याने ११ कोरोनाचे रुग्ण आढळुन आले असल्याची माहिती
कोरोना केअर सेंटर्स ईन्चार्ज वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी शुक्रवारी (ता. १७) दिली आहे.
दिलेल्या माहितीनुसार हिंगोली येथील ३४ वर्षीय पुरुष पलटन गल्ली , आय.एल.आय ( सर्दी , खोकला , ताप ) असल्यामुळे कोरोनाची तपासणी करण्यात आली . ३२ वर्षीय पुरुष नारायणनगर येथील आय.एल.आय ( सर्दी , खोकला , ताप ) असल्यामुळे कोरोना तपासणी करण्यात आली . वसमत येथील शुक्रवार पेठेतील ५२ वर्षिय स्त्री , ३४ पुरुष , ३ व १५ वर्षाची मुलगी कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती २ ९ वर्षीय स्त्री , २८ वर्षे स्त्री , ३० वर्ष पुरुष तर ३३ वर्षीय स्त्री बहिर्जी नगर , कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथील ४८ वर्षीय स्त्री कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहे. कोरोना केअर सेंटर वसमत अंतर्गत १ कोरोना रुग्ण ( जय नगर ) बरा झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे .
आज रोजी नव्याने ११ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत आणि १ कोरोना रुग्ण बरा झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे . आज पर्यंत हिंगोली जिल्हयात कोरोना चे एकुण ३८४ रुग्ण झाले आहेत . त्यापैकी २ ९ ४ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन ९ ० रुग्णांवर उपचार चालु आहेत .
आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय येथे २४ कोरोना रुग्ण आहेत यात ( १ रिसाला बाजार , १ गांधी चौक , १ जि.एम.सी.नांदेड ( आझम कॉलनी ) , १ धुत औरंगाबाद ( ब्राम्हण गल्ली वसमत ) , १ पेडगाव , ३ शुक्रवार पेठ , १ नवलगव्हाण , ३ तलाबकट्टा , २ दौडगाव , १ गवळीपुरा , १ पेन्शनपुरा , १ अंजनवाडी , १ सेनगाव , १ जयपुरवाडी , १ नवा मोंढा , कासारवाडा , १ आझम कॉलनी , १ पलटन , १ नारायण नगर )
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये २ ९ कोरोना रुग्ण आहेत यात ( १ वापटी , १४ शुक्रवार पेठ , ३ स्टेशन रोड , १ सोमवार पेठ , ५ सम्राट नगर , १ अशोक नगर , १ गणेशपेठ , १ पारडी , १ गुलशन नगर , १ बहिर्जी नगर ) येथील रहिवासी आहे तो उपचारासाठी भरती आहे . कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकुन ५ कोरोना रुग्ण आहेत यात ( ३ नवी चिखली , १ शेवाळा , १ नांदापुर ) येथील रहिवासी आहेत ते उपचारासाठी भरती आहेत . या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असुन कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत . कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत २ ९ कोरोनाचे रुग्ण आहेत त्यात ( १ तलाब कट्टा , १ भांडेगाव , १ हनवतखेडा , ४ कळमकोंडा , १४ पेडगाव , ५ रामादेऊळगाव , २ पहेणी , १ माळधामणी ) उपचारासाठी भरती आहेत . त्यांची प्रकृती स्थिर असुन सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत .
कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे २ कोरोनाचे रुग्ण आहेत ( २ वैतागवाडी ) उपचारासाठी भरती आहे . कोरोना केअर सेंटर औंढा येथे १ कोरोना रुग्ण ( अंजनवाडी ) उपचारासाठी भरती आहे . हिंगोली जिल्हयातंर्गत आयसोलेशन वार्ड , सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन ६२२६ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे . त्यापैकी ५५३७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत . ५३७६ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सद्यस्थितीला ८३८ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी ३५७ अहवाल येणे व थ्रोट स्वब घेणे प्रलंबित आहे .
आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजन चालु आहे . तसेच २ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे . अशा प्रकारे ६ कोरोना रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे .
आज रोजी खाजगी रुग्णालय नांदेड येथे एका ६६ वर्षीय पुरुष राहणार भाजीमंडी कळमनुरी यांचा कोरोना च्या आजाराने मृत्यु झाला आहे . सदरील रुग्णाला मधुमेह , उच्च रक्तदाब आणि श्वासाचा आजार असे को - मोर्बिट कंडीशन होत्या .
हिंगोलीतील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , अत्यंत इमरजन्सी असल्याशिवाय घरा बाहेर पडू नये व अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबुन मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.