हिंगोली एकास डिस्चार्ज तर एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या पोहचली 80 वर 

गुरुवारी एका योध्याचा कोरोनावर विजय


रुग्ण संख्या पोहचली ३७३ वर 


हिंगोली -  कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथील एक रुग्ण  गुरुवारी ठणठणीत बरा होऊन घरी परतल्याने त्यास सुट्टी देण्यात आली असून तो डिग्रस येथील आहे.


जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यन्त ३७३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २९३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजमितीला ८० कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.


जिल्हा सामान्य रुग्णालय 
आयसोलेशन वॉर्ड अंतर्गत २२  रुग्णांना भरती करण्यात आले आहे. यामध्ये. रिसाला एक, गांधी चौक एक, जीएमसी एक, धूत हॉस्पिटल एक, ब्राह्मण गल्ली वसमत एक,पेडगाव एक, शुक्रवार पेठ दोन, नव्हलगव्हाण एक, तालाब कट्टा तीन, दौडगाव दोन, गवळीपुरा एक, पेन्शन पुरा एक, अंधारवाडी एक, सेनगाव एक, 
जयपूरवाडी एक ,नवा मोंढा हिंगोली एक, कासारवाडा एक, आझम कॉलनी एक यांचा समावेश आहे. तर वसमत येथील डेडीकेटेट कोअर सेंटर येथे पाच रुग्ण भरती असून यात जयनगर एक, वापटी एक, शुक्रवार पेठ सात, स्टेशन रोड तीन, सोमवार पेठ एक, सम्राट नगर पाच, अशोकनगर एक, गणेशपेठ एक, पारडी एक, गुलशन नगर एक,यांचा समावेश आहे.


तसेच कळमनुरी येथे कोरोना सेंटर मध्ये  एकूण चार  रुग्णावर उपचार सुरु असून, नवी चिखली तीन, शेवाळा एक, नांदापूर एक, यांचा समावेश आहे. याशिवाय लिंबाळा अंतर्गत कोरोना सेंटर येथे २९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये तालाब कट्टा एक, भांडेगाव एक, हनवतखेडा एक, 
कळमकोंडा चार, पेडगाव चौदा ,
रामादेऊळगाव पाच,पहेनी दोन, 
माळधामणी एक,यांचा समावेश आहे.सेनगाव येथे वैतागवाडी येथील दोन रुग्णावर उपचार सुरु आहेत.या सर्वांची प्रकृती ठीक असून कोणतेही गंभीर लक्षणे दिसून येत नसल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.


जिल्ह्यात गावपातळीवर तसेच क्वारं टाइन सेंटर अंतर्गत  ६१८७ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ५४ ८३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.५३५८व्यक्तींना घरी सुट्टी देण्यात आली आहे.आजघडीला ८१७ रुग्ण भरती असून, ३८२जणांचे अहवाल येणे बाकी आहे.


 जिल्हा सामान्य रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णा पैकी चार रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तसेच दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायप्याप मशीनवर ठेवले आहे. तसेच सहा रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले .


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा