वसमत येथे पावणे चार लाखाची धाडसी चोरी
वसमत येथे पावणे चार लाखाची धाडसी चोरी
रोकड सह सोन्या, चांदीचे दागिने चोरट्याने पळविले
वसमत - वसमत येथील शहरपेठ भागात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा ३ लाख ९२ हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असून या बाबत गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील शहरपेठ भागात राहणारे सत्यप्रकाश सरोजी भागवत यांच्या घरी बुधवार (ता. ८) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम लंपास केली यात 2,10,000-00 रुपये किमतीच्या हातातील सोन्याच्या 10 ग्रॅमच्या 07 अंगठ्या , तसेच 45000-00 रुपये किमंतीचे एक हातातील 15 ग्रॅमची सोन्याची अंगठी 45000-00 रु कानातील 15 ग्रॅम सोन्याचे फुल आणि साखळी 75000-00 रुपये गळ्यातील 25 ग्रॅम सोन्याचे गठन, 15000-00 रुपये एक हातातील 05 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 2,000-00 रु नगदी रुपये त्यात 500 रुपयाच्या तिन नोटा, दोनशे रुपयाची एक नोट शंभर रुपयाचे तीन नोटा एकुन तीन लाख ९२ हजार रुपये असा ऐवज लंपास केला. सततच्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आता चोरट्यांना पकडण्याचे तगडे आव्हान पोलिसासमोर उभे आहे.
या बाबत सत्यप्रसाद भागवत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ९ गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.