परभणी जिल्ह्यात मध्ये 7 पॉझेटिव्ह - (झरी, गंगाखेडचे प्रत्येकी 2 रुग्ण तर मानवतमधील एक )
परभणी जिल्ह्यात मध्ये 7 पॉझेटिव्ह , झरी, गंगाखेडचे प्रत्येकी 2 रुग्ण तर मानवतमधील एकाचा समावेश
- परभणी जिल्ह्यात आज सोमवारी 6 जुलै रोजी सकाळी आढळलेल्या 7 कोरोनाबधितांमध्ये परभणी, झरी व गंगाखेडचे प्रत्येकी 2 रुग्ण तर मानवतमधील पोलीस वसाहतीतील एकाचा समावेश आहे.
- परभणीतील सरफराज नगरात 28 वर्षीय महिला व 33 वर्षीय पुरुष असे दोन, झरी येथील 28 वर्षीय महिला व व 45 वर्षीय पुरुष असे दोन आणि गंगाखेड येथील पूजा मंगल कार्यालय परिसरात राहणारी वर्षीय महिला बाधित आहे तसेच गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा गावातील 55 वर्षीय महिला पॉझिटिव आली आहे. मानवत येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या 55 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आज सोमवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी 7 रुग्ण पॉझिटिव वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या आता दीडशेवर पोहोचली आहे. आतापर्यंत 98 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून यातील चार जणांचा यापूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2791 संशयितांची नोंद करण्यात आली आहे यातील 3004 पैकी 2694 यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. 33 जणांचे अहवाल प्रलंबित तर तर 89 अनिर्णायक आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 8 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सोनपेठ व जिंतूर नगरपरिषद वगळता इतर नागरी भागात संचारबंदी लागू केली आहे.