परभणी, कोरोनाचा पाचवा बळी;
कोरोनाचा पाचवा बळी;
रवळगावचा वृद्ध रुग्ण दगावला
परभणी /प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झालेली असताना आज गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी सकाळी एका 60 वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. तो सेलू तालुक्यातील रवळगाव येथील रहिवासी होता. 7 जुलै रोजी त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच गुरुवार सकाळी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 181 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यातील 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 107 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 73 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सेलू व गंगाखेड येथे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे.