हिंगोलीत नव्याने १२ जणांना कोरोनाची बाधा, दोघांचा मृत्यू
पुन्हा मुंबई, पुणे कनेक्शन ; हिंगोलीत नव्याने १२ जणांना कोरोनाची बाधा, दोघांचा मृत्यू
दोन दिवसात चौघांचा मृत्यू ,
हिंगोली -बुधवारी प्राप्त अहवालानुसार हिंगोली जिल्हांतर्गत नव्याने १२ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . आणि या पैकी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला असून, दोन दिवसात चौघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.
आज प्रॉत अहवालानुसार हिंगोली येथील श्री नगरातील ३८,२२, वर्षीय पुरुष हा कोरोना जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत,रिसाला बाजार येथील २०,२७ पुरुष हे राजस्थान मधून गावी परतले आहेत. तर गायत्री नगर येथील २२ वर्षीय पुरुष हा पुणे येथून आला आहे. शहरातील मस्तानशहानगर येथील तीस वर्षीय पुरुष हा मुंबई वरून परतला आहे, तालाब कट्टा येथील४५ वर्षीय तरुण हा बीड मधून गावी आला आहे. तसेच वसमत तालुक्यातील पारडी येथील५५ वर्ष पुरुष व ४० वर्ष स्त्री जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहे. तर वसमत येथील शिवाजी नगर येथील ५५वर्ष पुरुष व ५०वर्ष स्त्री
आयएलआय ताप, सर्दी, खोकला असल्याने तपासणी करण्यात आली त्यामध्ये हे दोघे पॉझिटिव्ह आले आहेत.
दोन कोरोनाने मृत्यू झाल्याचा तपशील पुढील प्रमाणे आझम कॉलनी येथील ३५ वर्षीय तरुण हा कोविड च्या आजाराने मृत्यू झाला तर दुसरा
मंगळवारा भागातील हा देखील कोविडच्या आजाराने मृत्यू झाला आहे. वसमत कोरोना सेंटर अंतर्गत स्टेशन रोडचा एक रुग्ण बरा झाला आहे.तर जिल्हा रुग्णालयातील तीन रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये तालाब कट्टादोन, गवळीपुरा एक यांचा समावेश आहे. आज रोजी बारा रुग्ण नव्याने आढळून आले असून, चार रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.तर नव्याने दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आज पर्यंत जिल्हयात कोरोनाचे एकुण ४५२ रुग्ण झाले आहेत . त्यापैकी ३२७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन १२० रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ५ कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला आहे .कोरोना केअर सेंटर औंढा येथे १ कोरोनाचा रुग्ण ( अंजनवाडी ) उपचारासाठी भरती आहे . आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे ३० कोरोना रुग्ण आहेत यात ( १ रिसाला बाजार , १ जि.एम.सी.नांदेड ( आझम कॉलनी ) , १ धुत औरंगाबाद ( ब्राम्हण गल्ली वसमत ) , १ पेडगाव , ९ शुक्रवार पेठ , १ नवलगव्हाण , १ पेन्शनपुरा , १ अंजनवाडी , ३ सेनगाव , १ जयपुरवाडी , १ नवा मोंढा , २ कासारवाडा , २ आझम कॉलनी , १ पलटन , १ नारायण नगर , १ अशोक नगर , श्रीनगर , १ मंगळवारा , १ पंचशील नगर वसमत ) यांचा समावेश आहे.
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये २० कोरोना रुग्ण भरती आहेत यामध्ये ( २ स्टेशन रोड , ५ सम्राट नगर , १ गणेशपेठ , १ पारडी , १ गुलशन नगर ( नांदेड येथे संदर्भात ) , १ बहिर्जी नगर , १ स्वानंद कॉलनी ( नांदेड येथे संदर्भात ) , २ अशोक नगर , १ शिरळी , १ पळसगाव ,शिरली एक येथील रहिवासी आहे तो उपचारासाठी भरती आहे . कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकुण १७ कोरोना रुग्ण ( ३ आखाडा बाळापुर ( नांदेड संदर्भात ) , २ कांडली , १ रेडगांव , ६ भाजी मंडी , ५ जि.प.हिंगोली ) येथील रहिवासी आहेत ते उपचारासाठी भरती आहेत . या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असुन कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत . कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत ४७ कोरोनाचे रुग्ण आहेत यात ( १४ पेडगाव , ५ रामादेऊळगाव , २ पहेणी , १ माळधामणी , ११ तलाब कट्टा , ७ खडकपुरा ,कण्हेरगाव एक, श्रीनगर दोन, मस्तानशहा नगर एक, रिसाला दोन, गायत्री नगर एक,उपचारासाठी भरती आहेत . त्यांची प्रकृती स्थिर असुन सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत . कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे ५ कोरोनाचे रुग्ण आहेत यात ( १ बस स्टॅन्ड जवळ , ३ बालाजी नगर , १ वार्ड नं .१० समता नगर ) उपचारासाठी भरती आहे .
हिंगोली जिल्हयातंर्गत आयसोलेशन वार्ड , सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन ६७४४ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे . त्यापैकी ५९४४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत . ५८२० व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सद्यस्थितीला ९२७ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी ४३०जणांचे अहवाल येणे, थ्रोट स्वब घेणे प्रलंबित आहे . तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी आठ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजन चालु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.