हिंगोलीत नव्याने आठ कोरोना रुग्णांची भर, एकाचा मृत्यू तर ३६ रुग्णाची कोरोनावर मात
हिंगोलीत नव्याने आठ कोरोना रुग्णांची भर, एकाचा मृत्यू
३६ रुग्णाची कोरोनावर मात
हिंगोली, - हिंगोली जिल्हयामध्ये बुधवारी नव्याने एकुन ८ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . त्यातील १ रुग्ण अॅन्टीजन तपासणीत पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे व एका कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला असून ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.
आज सापडलेल्या रूग्णांत हिंगोली येथील नाईक नगर , येथील ५९ वर्षीय महिला ,वंजारवाडा येथे १ वर्षाचा मुलगा, तलाबकट्टा येथील ३५ वर्षाची महिला, आझम कॉलनी येथे ५६ वर्षाचा पुरुष, रिसाला बाजार येथे १ पुरुष ,एस.आर.पी.एफच्या एका ३१ वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे.
हिवरा ता. कळमनुरी येथील ४४ वर्षीय पुरुष, वसमत तालुक्यातील शिवपुरी येथील ३६ वर्ष महिलेचा समावेश आहे. दरम्यान, हिंगोली येथील कासारवाडा येथील ५० वर्षीय पुरुषाचा कोरोनाच्या आजाराने मृत्यु झाला आहे.
विशेष म्हणजे आज ३६ कोरोना योध्यानी कोरोना वर विजय मिळवीत र बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे . आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे ( ८ कोरोना रुग्ण ) आहेत यात १ पेडगाव , १ नवलगव्हाण , १ आझम कॉलनी , १ अंजनवाडी , १ नवा मोंढा , १ अशोक नगर वसमत , १ सेनगाव , १ रिसाला बाजार कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे ( १४ कोरोना रुग्ण ) ६ भाजीमंडी कळमनुरी , २ कांडली , १ रेडगाव , ५ जिल्हा परिषद हिंगोली, कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथे ( १२ कोविड -१ ९ रुग्ण ) ५ तलाबकट्टा , ७ खडकपुरा हिंगोली तर कोरोना केअर सेंटर वसमत ( २ कोरोना रुग्ण ) २ अशोक नगर येथील आहेत.
आज रोजी हिंगोली जिल्हयात ८ नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . ३६ कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . आज पर्यंत हिंगोली जिल्हयात कोरोनाचे एकुण ५९३ रुग्ण झाले आहेत . त्यापैकी ४२१ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन १६५ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ७ कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला आहे .
हिंगोली जिल्हयातंर्गत आयसोलेशन वार्ड , सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन ७२७० व्यक्तींना भरती करण्यात आले आहे . त्यापैकी ६४८२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत . ६७१२ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सद्यस्थितीला ५३८ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी २२३ अहवाल येणे , स्वब घेणे प्रलंबित आहे . ७ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे . आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १८ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजन चालु आहे , एका २८ वर्ष कोरोना रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याला बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.