दिलासादायक ; हिंगोली, एकाच दिवशी दहा योध्याचा कोरोनावर विजय तर एक पॉझिटिव्ह
दिलासादायक ; एकाच दिवशी दहा योध्याचा कोरोनावर विजय तर एक पॉझिटिव्ह
हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथील व अधिनस्त असलेल्या कोरोना सेंटर येथील उपचार घेत असलेले दहा रुग्णांनी एकाच दिवशी कोरोनावर विजय मिळविला तर दुसरीकडे वसमत येथील अशोक नगर येथील एकाला कोरोनाची बाधा झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो औरंगाबाद येथील रहिवासी आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवशी दहा कोरोना योध्यानी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये लिंबाळा येथील येथील चार यात प्रगतीनगर एक, पिंपळ खुटाएक, भांडेगाव दोन, तर वसमत सेंटर येथील चार रुग्ण बरे झाले आहेत. यात टाकळगव्हाण दोन, रिधोरा एक, दर्गा पेठ एक, तसेच कळमनुरी येथील विकास नगर दोन, रुग्ण असे एकूण दहा रुग्ण बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी थांबली आहे.
वसमत अंतर्गत क्वारंटाइन सेंटर अंतर्गत एका३३ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. सदरील रुग्ण हा अशोक नगर येथील रहिवासी आहे. तो औरंगाबाद येथून गावी परतला आहे.आज पर्यंत हिंगोली जिल्हयात कोरोना चे एकुण ३३३ रुग्ण झाले आहेत . त्यापैकी २८७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन ४६ रुग्णांवर उपचार चालु आहेत .
आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे १६ कोरोना रुग्ण यात १ रिसाला बाजार , १ मकोडी , २ बहिर्जी नगर , १ गांधी चौक , १ जि.एम.सी.नांदेड , १ पेडगाव , २ शुक्रवार पेठ , १ नवलगव्हाण , ३ तलाबकट्टा , २ दौडगाव , १ गवळीपुरा येथील आहेत.
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये १६ कोरोना रुग्ण १ दर्गापेठ , १ रिधोरा , २ टाकळगाव , १ जय नगर , १ वापटी , ७ शुक्रवार पेठ , १ स्टेशन रोड , १ सोमवार पेठ , १ सम्राट नगर येथील रहिवासी आहे तो उपचारासाठी भरती आहे . कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकुन ९ कोरोना रुग्ण २ विकास नगर , ४ नवी चिखली , १ डिग्रस , १ शेवाळा , १ नांदापुर येथील रहिवासी आहेत ते उपचारासाठी भरती आहेत . या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असुन कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत .
कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत सात कोरोनाचे रुग्ण तालाब कट्टा एक, भांडेगाव एक, हनवतखेडा एक, कळमकोंडा चार उपचारासाठी भरती आहेत . त्यांची प्रकृती स्थिर असुन सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत .तसेच कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथे एकूण सात रुग्णावर उपचार सुरु असून यात ,नवी चिखली चार, डिग्रस एक, शेवाळाएक, नांदापूर एक यांचा समावेश आहे.कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे ३ कोरोनाचे रुग्ण १ केंद्रा बुद्रुक, २ वैतागवाडी उपचारासाठी भरती आहे .
हिंगोली जिल्हयातंर्गत आयसोलेशन वार्ड , सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन ५९१६ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे . त्यापैकी ५३०२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत . ५१८७ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे .सद्यस्थितीला ७१९ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी ३१७ अहवाल येणे व थ्रोट स्वब घेणे प्रलंबित आहे .