परभणी जिल्ह्यात आज 3 पॉझिटिव रुग्ण
परभणी जिल्ह्यात आज 3 पॉझिटिव रुग्ण
परभणी /प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून आज गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी 3 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. परभणी शहरातील गांधी पार्क परिसरात राहणारा 33 वर्षीय युवक व शहरातील सोनार गल्ली भागातील 60 वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे. तसेच जिंतूर तालुक्यातील हिवरखेडा येथील 45 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. परभणीतील गांधी पार्क भागातील बाधित युवक जिल्हा परिषद कार्यालयात कार्यरत आहे. त्याची नियुक्ती जिल्हा कचेरीतील ऑनलाइन पास देण्यासाठी करण्यात आली होती. त्या ठिकाणी तो बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 183 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यातील 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 75 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.