धक्कादायक.... परभणी जिल्ह्यात दिवसभरात 25 जण पॉझिटिव्ह.
धक्कादायक.... परभणी जिल्ह्यात दिवसभरात 25 जण पॉझिटिव्ह.
परभणी 11, गंगाखेड 10,
मानवत 2,
पाथरी व सेलू 1.
परभणी प्रतिनिधी,/-. परभणी जिल्ह्या करिता बुधवार दिनांक 8 जुलै अतिशय धक्कादायक ठरला असून आज जिल्हाभरात तब्बल 25 कोरोना ग्रस्त नवीन रुग्णांची भर झाली आहे त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा चांगलीच हादरली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून परभणी जिल्ह्यात कोरूना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील आठ दिवसाचा जर विचार केला तर दररोज 7,8 रुग्ण सापडत आहेत. परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तर जिल्ह्यातून तसेच विदेशातून बऱ्याच नागरिकांची परभणीत दाखल झाले आहेत. हे दाखल होणारे नागरिक कुठलीही आरोग्य तपासणी न करता शहरासह तालुक्यात ये जा करत आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या देखील दिवसागणिक वाढतच चालली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत परभणी जिल्ह्यात एकूण पाच रुग्ण सापडले होते. परंतु रात्री अकरा वाजता आलेल्या अहवालानुसार परभणी जिल्ह्यात तब्बल 25 कोरोना ऋग्न सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे. त्यात परभणीतील 11, गंगाखेड 10, मानवत 2, पाथरी व सेलू प्रत्येकी 1 असे आहेत. परभणी शहरातील जागृती मंगल कार्यालय, काद्राबाद प्लॉट, सर्फराज नगर या भागात एकूण 11 रुग्ण सापडले आहेत. तर गंगाखेड पूजा मंगल कार्यालय परिसरात एकूण 10 रुग्ण सापडले आहेत. मानवत येथील पोलिस वसाहतीत 2 कोरोना रुग्ण सापडले आहेत. सेलू तालुक्यातील करडगाव येथे 1 तर पाथरी शहरातील 1 महिला असे एकूण जिल्हाभरात बुधवारी रात्री 11 अहवालानुसार तब्बल पंचवीस नवीन रुग्ण सापडले असल्याने आरोग्य विभागाची मोठी डोकेदुखी वाढली आहे. शिवाय प्रतिबंधक क्षेत्राची ही घोषणा यावेळी करण्यात आली असून संबंधित प्रतिबंधक क्षेत्रात जिल्हा प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत निर्जंतुकीकरणआचे काम सुरू होते. जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्य विभागाकडून नागरिकांना पुन्हा एकदा सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय गुरुवार दि. 9 जुलै रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर पुन्हा संचारबंदी लावण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाच्या गोपनीय सूत्रांकडून दैनिक मराठवाडा केसरीच्या प्रतिनिधीशी रात्री 11 वाजता बोलताना सांगितले.