*संचारबंदी काळातील निर्बंधावर 21 ते 24 जुलै पर्यंत अंशत: बदलचे आदेश जारी*

 


दिनांक:-20 जूलै 2020


 


*संचारबंदी काळातील निर्बंधावर 21 ते 24 जुलै पर्यंत अंशत: बदलचे आदेश जारी*


लातूर दि.20-(जिमाका)- कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. केंद्र शासनाकडून दिनांक 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते व त्यानंतर पुढे विविध टप्प्यामध्ये सदरचे लॉकडाऊन दिनांक 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आले होते. 
परंतु लातूर जिल्हयात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्णसंख्या विचारात घेता कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातुन खबरदारीचा उपाय म्हणून लातूर जिल्हयात दिनांक 15 जुलै 2020 ते 30 जुलै 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ज्याव्दारे काही आस्थापना अत्यावश्यक बाबी / सेवा मर्यादित स्वरुपात व निर्बंधासह सुरु ठेवण्यात आल्या होत्या. *त्यामध्ये अंशत:बदल करुन  दिनांक 21 जुलै ते 24 जुलै 2020 या कालावधीसाठी पुढील प्रमाणे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत*.
    एकत्रीत बाजारपेठे बाहेरील स्वयतंत्र (Stand alone) उभी असलेली किराणा, भाजीपाला, बेकरी, व फळांची दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यत सुरु राहतील. ज्या, ठिकाणी ग्राहकांना आत प्रवेश देवून खरेदी केली जाते अशी सुपर मार्केटस् (डी मार्ट, पुरुषोत्तीम मार्केट, विश्वे सुपर मार्केट, बिग बाझार इत्यामदी) बंद राहतील. परंतु ऑनलाईन/दूरध्ववनी वरुन प्राप्तप ऑर्डरनुसार दुपारी 12.00 वाजेपर्यंत घरपोच साहित्यी वितरीत करता येईल. घरपोच सेवा पुरविणा-या व्य0क्तीरस गणवेश व ओळखपत्र असणे आवश्यरक आहे.  किराणा, भाजीपाला, बेकरी साहित्यक व फळांची सकाळी 09.00 पर्यंत ठोक विक्री करता येईल. ठोक विक्री फक्त् किरकोळ विक्रेत्यां च्याशसाठी असेल. सदर ठिकाणी प्रत्य क्ष नागरिकांना प्रवेश नसेल.  
मटण, चिकन, अंडी विक्रीची दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. शिवभोजन थाळीचे उपहारगृह पार्सल सेवेसाठी दुपारी 01.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याीत येतील. अत्यालवश्य क सेवेशी निगडीत नसलेले कारखाने/उद्योग कामाच्याणठिकाणी मजुरांच्यार राहण्याेची व जेवणाची सोय असेल तरच सुरु ठेवता येतील. पाणी पुरवठा (जार, टॅंकर) दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.  अॅटो रिक्षा फक्तव माल/साहित्याटची ने-आण करण्यारसाठी वापरता येईल. अॅटोने प्रवासी वाहतूक अनुज्ञेय नाही. तसेच माल वाहतूक करणारे वाहनांद्वारे (किराणा व इतर मालाची) दुपारी 12.00 पर्यंत माल वाहतूक करता येईल. इंटरनेटसारख्यात संपर्क साधनांसंबंधी सेवा पुरविणा-या संस्थांलना त्यांाच्याे आस्थांपना आवश्यसकते नुसार सुरु ठेवता येईल.  
 वाहनांचे अधिकृत सर्व्हिस सेंटर सुरु ठेवता येतील.  कोणत्यावही प्रकारच्याय अत्यांवश्य्क बाबींच्याठ खरेदीसाठी जाताना नागरिकांच्या  वाहन वापरावर निर्बंध असेल. नागरिकांनी खरेदीसाठी जाताना शक्यर तितक्यां जवळचे ठिकाण निवडावे आणि पायी किंवा सायकल या दोनच पर्यायाचा वापर करावा. तसेच खरेदीसाठी जाताना अतिरिक्तस खबरदारी म्हाणून छत्रीचा वापर केल्यादस आपोआपच शारिरीक अंतर राखण्याकस मदत होईल याचा सकारात्मूक विचार करावा.
  या आदेशाची दि. 21 ते 24 जुलै 2020 पर्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्का्ळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न  करणा-या कोणतीही व्ययक्ती, संस्था , अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती, व्य वस्थाापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्याक कृत्याडसाठी कोणत्यााही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही असेही आदेशात नमुद केले आहे.
               ********


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा